अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन,वनताराकडून प्रस्ताव

वंतरा न्यूज : दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाच्या मॅग्डालियाना नदीच्या खोऱ्यात राहणाऱ्या 80 पाणघोड्यांना ठार मारण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक आणि जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव बचाव व संवर्धन केंद्रांपैकी एक असलेल्या ‘वनतारा’चे संस्थापक अनंत मुकेश अंबानी यांनी कोलंबिया सरकारला या पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचे अधिकृत आवाहन केले आहे. अनंत अंबानी यांनी यासंदर्भात एक मानवतावादी पर्याय सुचवला आहे. या प्राण्यांना सुरक्षितपणे आणि शास्त्रीय पद्धतीने गुजरातच्या जामनगर येथील ‘वनतारा’मध्ये  स्थलांतरित करावं , जिथे त्यांना कायमचे घर मिळू शकेल, असा प्रस्ताव अनंत अंबानी यांनी दिला आहे.

अनंत अंबानी यांनी कोलंबियाच्या पर्यावरण मंत्री, आयरीन वेलेझ टोरेस यांना पत्र लिहून हे आवाहन केले आहे. कोलंबियाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेख व मंजुरीच्या अधीन राहून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे.या ऑफरमधून प्राणी कल्याणाप्रती अनंत अंबानी यांची असलेली कटिबद्धता दिसून येते. या क्षेत्रातील कामासाठी त्यांना नुकताच ‘ग्लोबल ह्युमेन अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठित सन्मान मिळवणारे ते सर्वात तरुण व्यक्ती आणि पहिले आशियाई आहेत.

शक्य ते सर्व प्रयत्न करणं आपली जबाबदारी:अनंत अंबानी

अनंत अंबानी म्हणाले, “हे 80 पाणघोडे संवेदनशील प्राणी असून बदलत्या परिस्थितीचे बळी ठरलेले असहाय्य प्राणी आहेत. जर त्यांना सुरक्षितपणे आणि माणुसकीने वाचवण्याची क्षमता आपल्यात असेल, तर शक्य ते सर्व काही करणे ही आपली जबाबदारी आहे.”

वनताराने कोलंबियाच्या अधिकाऱ्यांकडे एक सविस्तर निवेदन सादर केलं आहे, ज्यामध्ये पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे पथक, सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था, जैवसुरक्षा नियमावली आणि त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणासारखा अधिवास उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.

निसर्गाचे रक्षणावेळी प्राण्यांचं संरक्षण शक्य :अनंत अंबानी

अनंत अंबानी पुढे म्हणाले, “करुणा आणि प्राण्यांची सुरक्षा या परस्परविरोधी गोष्टी नाहीत. योग्य वैज्ञानिक विचार आणि सुनियोजित दृष्टिकोनाने, समाज आणि निसर्गाचे रक्षण करत प्राण्यांना वाचवणे शक्य आहे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी वनताराकडे कौशल्य आणि पायाभूत सुविधा आहेत.”

या पर्यायावर पूर्णपणे विचार होईपर्यंत जनावरांना मारण्याचा निर्णय स्थगित करावा, अशी औपचारिक विनंती वनताराने केली आहे. तसेच, कोलंबियन अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यास आणि एक सविस्तर वैज्ञानिक, कार्यान्वयन व कल्याणकारी प्रस्ताव सादर करण्यास आपण पूर्णपणे तयार असल्याचेही वनताराने म्हटले आहे.

प्रत्येक सजीव अनमोल:वनताराचा प्रस्ताव

वनतारानं कोलंबियातील अधिकाऱ्यांना दिलेला प्रस्ताव त्यांच्या ‘प्रत्येक सजीव अनमोल आहे’ या मूळ विश्वासाचे प्रतिबिंब आहे. तसेच, जटील जागतिक वन्यजीव आव्हानांना मोठ्या प्रमाणावर, विज्ञान-आधारित उपाययोजना पुरवण्यात भारताची उदयास येत असलेली भूमिकाही यातून अधोरेखित होते. या योजनेची कोणतीही अंमलबजावणी कोलंबिया आणि भारत सरकारांकडून आवश्यक मंजुरी आणि संबंधित आंतरराष्ट्रीय प्राधिकरणांच्या परवानगीच्या अधीन असेल, असं सांगण्यात आलं आहे.

कोलंबियाच्या मॅग्डालियाना नदीच्या खोऱ्यात अंदाजे 200 पाणघोडे राहतात, जे 1980 च्या दशकात आणलेल्या एका लहान गटाचे वंशज आहेत. भक्षकांचा अभाव आणि अनुकूल वातावरणामुळे पाणघोड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे या प्रदेशाच्या जैवविविधतेला आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी यापैकी 80 प्राण्यांना मारण्याची परवानगी दिली होती, त्यांना वाचवण्यासाठी वनतारानं प्रयत्न सुरु करत प्रस्ताव दिला आहे.

वनतारा संस्थेविषयी

गुजरातच्या जामनगर येथील वनतारा हे जगातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक वन्यजीव बचाव, संगोपन आणि संवर्धन केंद्रांपैकी एक आहे. हे केंद्र संकट, शोषण किंवा विस्थापन यांसारख्या कठीण परिस्थितीतून वाचवलेल्या हत्ती, वाघ, सिंह (मोठे मांजरवर्गीय प्राणी), वानर, सरपटणारे प्राणी आणि इतर सस्तन प्राण्यांसाठी तज्ञ पशुवैद्यकीय सहाय्य, दीर्घकालीन काळजी आणि विशेष सुविधा पुरवते.

वनतारा जगभरातील संवर्धन संस्था, राष्ट्रीय सरकारे आणि आंतरराष्ट्रीय वन्यजीव प्राधिकरणांसोबत जवळून काम करते. या संस्थेने वन्यजीवांना वाचवण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि सीमापार स्थलांतरित करण्यासाठीच्या जागतिक उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. अधिवासाची पुनर्स्थापना, स्थानिक समुदायाचा सहभाग, जनुकीय विश्लेषण आणि विज्ञान-आधारित संवर्धन यांवर लक्ष केंद्रित करून, वंतारा अशा निरोगी परिसंस्था तयार करत आहे, जिथे वन्यजीव सुरक्षितपणे भरभराटीस येऊ शकतील. ही संस्था लुप्त होत असलेल्या  प्रजातींचे पुनर्वनीकरण करण्याच्या दिशेनेही काम करते.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.