Andheri Crime : मेट्रो स्टेशनचं काम सुरु असतानाच 20 वर्षीय तरुण 12 व्या मजल्यावरून खाली कोसळला
अंधेरी गुन्हे: अंधेरी पूर्वेत जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली इमारतीचं बांधकाम सुरू असताना 20 वर्षीय तरुण इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून खाली कोसळला असून त्याचा मृत्यू झालाय. एमआयडीसी पोलिसांकडून एडीआर दाखल करत मुलाची हत्या की आत्महत्या या दोन्ही अँगलने तपास सुरू करण्यात आलाय. शदाप (वय 20) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
तरुण इमारतीमध्ये इलेक्ट्रिक सुपरवायझर म्हणून काम करत होता
अधिकची माहिती अशी की, अंधेरी पूर्वेत जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली सहार प्लाजाच्या शेजारी नवीन इमारतीचा बांधकाम सुरू असताना इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून 20 वर्षीय मजूर खाली पडला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (दि.12) संध्याकाळी घडली आहे. संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. 20 वर्षीय शदाप त्या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक सुपरवायझर म्हणून काम करत होता. घटनेची माहिती मिळतच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बॉडी शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयामध्ये पाठवली आहे. सध्या एमआयडीसी पोलिसांनी एडीआर दाखल करत मुलांनी आत्महत्या केली आहे की मुलाची हत्या झाली? या संदर्भात अधिक तपास करत आहेत….
अंधेरी पूर्वेत जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली सहार प्लाजाच्या शेजारी नवीन इमारतीचा बांधकाम सुरू असताना इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून 20 वर्षीय मजूर खाली पडलाय. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी घडली आहे. घटनेची माहिती मिळतच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बॉडी शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालय मध्ये पाठवली आहेत. सध्या एमआयडीसी पोलिसांनी एडीआर दाखल करत मुलांनी आत्महत्या केली आहे की मुलाची हत्या झाली या संदर्भात अधिक तपास करत आहेत….
नवी मुंबईत भरधाव कारची तरुणींना धडक, दोघांचा मृत्यू
दरम्यान, भरधाव कारच्या धडकेत दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना कोपरी येथे पामबीच मार्गावर घडली आहे. अपघातानंतर कार चालकाने पळ काढला असून एपीएमसी पोलिस होण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्कृती खोकले आणि अंजली पांडे दोघीही तुर्भे एमआयडीसी मध्ये खासगी कंपनीत कामाला होत्या. कामावरून सुटल्यानंतर दोघीही कोपरीच्या दिशेने विरुद्ध मार्गावरून येत होत्या. त्याचवेळी पामबीचवरुन सायन पनवेल मार्गाकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघीही गंभीरजखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी अज्ञात कार चालकावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.