राज्यभर चर्चा झालेल्या अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित; जिल्हाधिकारी कुमार आशीर
Angar Nagarpanchayat Election 2025: अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित (Angar Nagarpanchayat Election Postponed) करण्यात आली आहे. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहेत.
अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याच्या विरोधात राज्यभर येथील दहशतीची मोठी चर्चा झाली होती. आता या निवडीला स्थगिती देण्यात आली असून सुधारित कार्यक्रमानुसार येथे पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे अनगर नगरपंचायतीची निवडणूक कधी होईल, याबाबत आज सविस्तर स्पष्टता येईल.
मंगळवेढा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायत यांच्या निवड प्रक्रियेला स्थगिती- (Angar Nagarpanchayat Election 2025 Postponed)
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायत यांच्या निवड प्रक्रियेला स्थगिती आदेश दिले असून आता सुधारित कार्यक्रमानुसार येथील निवडणूक प्रक्रिया घेतली जाईल असे आदेश आहेत.
अनगरची निवडणूक स्थगित, आता पुढे काय? (Angar Nagarpanchayat Election)
अनगर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अपील दाखल होती आणि न्यायालयाने 23 तारखेपर्यंत निकाल दिलेत त्यांना आधीच प्रक्रिया राहिलं. मात्र अनगरचा न्यायालयात निकाल 25 ला झाल्याने तांत्रिक दृष्टीने प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नवीन कार्यक्रमनुसार प्रक्रिया पार पाडताना आयोगला अनगरमध्ये प्रत्येक पदासाठी केवळ एक अर्ज असल्याचे कळवले जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगतर्फे बिनविरोधची घोषणा होईल.
मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले? (Jaykumar Gore On Angar Nagarpanchayat Election)
अनगरची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक बिनविरोध झाली आहे. नेमक्या कोणत्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे तो कोर्टाचा विषय आहे. आम्ही माहिती घेऊन कोर्टात बाजू मांडू, मात्र अजून तो आदेश मला पाहायला मिळाला नाही अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
20 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या- (20 municipal council elections postponed)
राज्यातली जवळपास 20 नगरपरिषदांमधून एक मोठी बातमी समोर आलीय. राज्यातील काही नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागलाय आहे. अर्थात गेल्या दोन आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता. तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथं आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे.
नेमकं प्रकरण काय? (Angar Nagarpanchayat Election 2025)
अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी (Angar Nagarpanchayat Election 2025) तीन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज केला होता. अर्जाच्या छाननीत उज्वला थिटे यांनी नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. यानंतर चौकशी केली असता उज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. यानंतर डमी आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला आणि प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडण्यात आले होते.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.