माझं संतोष देशमुखांसारखं झालं तर माझा मुलगा पाटील कुटुंबाशी लढेल; उज्ज्वला थिटे आक्रमक


Solapur Angar Nagarpanchyat elections : सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत (Angar) नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूर (Solapur) सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या उमेदवारीचा अर्ज बाद केल्यानंतर त्यांच्या अर्जावरील अपील संदर्भातील सर्व बाजूचे युक्तिवाद आज न्यायालयात पूर्ण झाले आहेत. न्यायाधीशानी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे. यानंतर उज्वला थिटे आणि त्यांचे सुपुत्र जयवंत थिटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत आई आणि मी जिवंत आहे तोपर्यंत पाटील कुटुंबाशी लढाई सुरूच राहणार असल्याची भूमिक जयवंत पाटील यांनी घेतली आहे.

नेमकं काय म्हणाल्या उज्वला थिटे?

न्यायालयाच्या निकालामुळे मी हताश किंवा निराश झालेली नाही. न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा होती पण निर्णयाचा आम्ही आदर करतो. सविस्तर निकाल वाचल्यानंतर आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ असे थिटे म्हणाल्या. आमचा संघर्ष थांबलेला नाही हा संघर्ष सुरूच राहणार आहे. माझ्याकडून काही कागदपत्रावर सही घेतली मला ते पत्र दिलेच नाही. पूर्वीपासून मी लढत आलेय आता ही लढणार असल्याचे थिटे म्हणाल्या. पुढे निवडणूक लागल्यावर जर जागा सर्वसाधारण असेल तर माझा मुलगा अनगरमध्ये उमेदवार असेल असेही त्या म्हणाल्या.

माझा मुलगा हा वाघिणीचा बछडा आहे, तो गवत खाणार नाही आम्ही शरण जाणार नाही

पुढच्या निवडणुकीत मी पूर्णच्या पूर्ण पॅनल उभं करणार आहे. देवाने मला पाच वर्षांची संधी दिली तर त्या पाच वर्षात मी नक्कीच कायापालट करेन. प्राजक्ता पाटील या बिनविरोध झाल्या त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुमचं अभिनंदन आहे. उज्वला थिटेचा अर्ज फेटाळला गेला म्हणून तुम्ही बिनविरोध झाला पण पुढे लढाईची तयारी ठेवा असेही त्या म्हणाल्या. मी जरी नसले, माझं संतोष देशमुख सारखा घातपात झाला तर माझा मुलगा ही लढाई लढेल. माझा मुलगा हा वाघिणीचा बछडा आहे, तो गवत खाणार नाही आम्ही शरण जाणार नाही

काय म्हणाले जयवंत थिटे ?

माझं अजून ही म्हणणं आहे की मी फॉर्मवर सही केली होती.  पण त्यांनी कोर्टात असे कागदपत्रे सादर केलं की जसं मी सही केलीच नव्हती. आमचा अर्ज फेटळला असला तरी आमचा न्यायलयावर विश्वास आहे. जो पर्यंत आई आणि मी जिवंत आहे तोपर्यंत पाटील कुटुंबाशी लढाई सुरूच राहिलं असे जयवंत थिटे म्हणाले.
पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही पूर्ण पॅनल आम्ही लढवू असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

अनगर नगरपरिषदेतील वाद, कोर्टाने अर्ज फेटाळल्यानंतर उज्वला थिटे अन् वकिलांची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा

Comments are closed.