बुडत्याचा पाय खोलात! अनिल अंबानींच्या कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल, 2 हजार 220 कोटींची फसवणूक

अनिल अंबानी: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन विरोधात सीबीआयनं आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. शासकीय बँक व्यवहारांमध्ये 2 हजार 220 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल हा गुन्हा दाखल  झाला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आज दिवसभर अनिल अंबानींची ED कडून चौकशी करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ

दिवसेंदिवस उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एका बाजूला ईडीकडून त्यांची चौकशी सुरु असतानाच त्यांच्यावर आता सीबीआयनं आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रिलायन्स कम्युनिकेशन विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय बँक व्यवहारांमध्ये 2 हजार 220 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली

कालच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. त्यांचे मुंबईतील आलिशान निवासस्थान “अ‍ॅबोड” जप्त केले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ही मालमत्ता अंदाजे 3716.83 कोटींची आहे.

ईडीची मोठी कारवाई

ही कारवाई मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत करण्यात आली. ईडीने या संदर्भात तात्पुरते जप्तीचे आदेश जारी केले आहेत. सूत्रांच्या मते, हा आदेश अलीकडेच जारी करण्यात आला आहे. हा खटला अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) शी संबंधित एका कथित बँक फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. अ‍ॅबोड पाली हिलमध्ये आहे. “अ‍ॅबोड” नावाची ही आलिशान इमारत मुंबईच्या पाली हिल परिसरात आहे. 66 मीटर उंच, 17 मजली इमारत देशातील सर्वात महागड्या खाजगी मालमत्तांपैकी एक मानली जाते. ईडीच्या मते, अनिल अंबानी आणि त्यांच्या समूह कंपन्यांविरुद्ध आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, सर्वोच्च न्यायालयाने ईडीला रिलायन्स कम्युनिकेशन्स, त्यांच्या मूळ कंपन्या आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात बँक फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले.

महत्वाच्या बातम्या:

मनी लाँड्रिंग प्रकरणी उद्योगपती अनिल अंबानींविरुद्ध ईडीची मोठी कारवाई, 3 हजार 716 कोटी रुपयांचे घऱ जप्त

आणखी वाचा

Comments are closed.