मोठी बातमी : BCCI गुगली टाकणार, भारताचा महान फिरकीपटू अध्यक्षपदी बसवणार?
अनिल कुंबळे बीसीसीआय अध्यक्ष: आशिया कप 2025 च्या अगोदरच बीसीसीआयमध्ये मोठी उलथापालथ दिसत आहे. रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, पुढील निवडणुकीपर्यंत उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांच्याकडे कार्यवाहक अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार, वयाच्या 70 व्या वर्षानंतर कोणत्याही अधिकाऱ्याला आपले पद सोडावे लागते. याच कारणामुळे रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बीसीसीआयच्या पुढील अध्यक्षपदी (BCCI President) कोणाची निवड होणार याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (BCCI AGM) आणि निवडणूक 28 सप्टेंबरला होणार आहे. त्याच दिवशी नव्या अध्यक्षांची निवड होईल. मात्र त्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेटचा माजी महान फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. तसेच भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरच्या नावाची देखील चर्चा आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नेमकी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
कोण आहे अनिल कुंबळे?, पाहा क्रिकेटमधील कारकीर्द-
अनिल कुंबळे हे भारताचे माजी क्रिकेटपटू, कर्णधार आणि प्रशिक्षक असून क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंमध्ये त्यांचा समावेश होतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक आणि समालोचक म्हणून काम करायला सुरुवात केली आहे. 18 वर्षांच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये ते 132 कसोटी सामने आणि 271 एकदिवसीय सामने खेळले. कसोटी सामन्यांच्या इतिहासामध्ये भारताकडून खेळणाऱ्या सर्वात्कृष्ट फिरकीपटूंपैकी एक आहेत. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 619 गडी बाद केले आहेत, तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी 337 बळी घेतले होते. 1993 मध्ये त्यांची ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ म्हणून निवड झाली होती. 2016 ते 2017 पर्यंत ते भारताच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते.
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा कधी?
– 28 सप्टेंबर 2025 रोजी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (BCCI AGM) होणार आहे.
अदृषूक मुंबई येथील BCCI मुख्यालयात सकाळी 11:30 वाजता ही सभा होईल.
– बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव, कोषाध्यक्ष अशा पदांसाठी निवडणूक होणार आहे.
– विशेष म्हणजे बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा आशिया चषकाच्या फायनल सामन्याच्या दिवशीच होणार आहे.
रॉजर बिन्नी यांची कारकीर्द-
रॉजर बिन्नी 1983 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचे सदस्य आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 27 कसोटी व 72 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्यांनी 47 बळी मिळवले असून, दोन वेळा पाच बळींची कामगिरी केली आहे. तर एकदिवसीय सामन्यांत त्यांनी 77 बळी घेतले आहेत. रॉजर बिन्नी यांना 2022 मध्ये टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या जागी बीसीसीआयचे अध्यक्ष बनवण्यात आले. सौरव गांगुली 2019 ते 2022 पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष होते. बीसीसीआयची जबाबदारी स्वीकारणारे बिन्नी हे तिसरे माजी क्रिकेटपटू आहेत.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.