योगेश कमदांच्या घोटाळ्यांचे जिओ टॅगिंग, उद्याच मुख्यमंत्र्यांकडे पेनड्राईव्ह देणार, अनिल परबांन

Anil Parab On Yogesh Kadam: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेत योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बार प्रकरणासोबतच जगबुडी नदीतील वाळूचा विषय समोर आणला आहे.

रत्नागिरीमधील जगबुडी नदीतील गाळ काढला जातोय. मला हा गाळ काढू द्या, असं पत्र कदमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिलं होतं वाळू मिश्रित हा गाळ आहे. यामध्ये वाळू वेगळी केली जातेय. ही वाळू योगिता डेंटल कॉलेजच्या प्रांगणात पडली आहे. हे कॉलेज योगेश कदम यांच्या बहिणीचं आहे. जगबुडी नदीतील ही वाळू या योगिता डेंटल कॉलेजजवळ कशी आली?, ही वाळू येथे काय करतेय?, या वाळूचं काय केलं जातं?, असे सवाल अनिल परब यांनी उपस्थित केले. तसेच जिथे जिथे वाळू पडली त्याचे आम्ही जिओ टॅग लावून ड्रोन कॅमेरामार्फत शूट केले आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत. मी याचे पेन ड्राईव्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या देणार आहे, असं अनिल परब म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा घ्यावा, अन्यथा मी कोर्टात जाईल- अनिल परब

योगेश कदम यांचे वडील काल म्हणाले की, माझे मुलं किती कर्तृत्वान आहे. मात्र हे त्यांचे प्रताप असल्याची टीका अनिल परब यांनी केली. महादेव नाल्यातील रेती उपसायची होती. मात्र हे सावित्री नदीची रेती उपसत होते. अकील मुकादम हे सगळं काम करतो. ही रेती उपसतो, हा त्यांच्या घरात काम करणारा माणूस आहे. लक्षवेधी लागल्यानंतर आता गाळ उपसा बंद केला. सगळे पेपर, पेन ड्राईव्ह आणि इतर सगळी कागदपत्रे मी उद्या देवेंद्र फडणवीसांना देणार आहे. तसेच योगेश कदम यांचा देवेंद्र फडणवीसांना राजीनामा घ्यावा, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा राजीनामा घेऊ शकणार नाही, असा हल्लाबोल अनिल परब यांनी केला. तुमच्यात हिंमत असेल अब्रूनुकसानीचा दावा ठोका…माझ्यावर हक्कभंग आणा..देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा घ्यावा, अन्यथा मी कोर्टात जाईल, असा इशाराही अनिल परब यांनी दिला.

कदमांच्या सावली बारवर अनिल परब काय म्हणाले?

योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेला सावली बार आहे, तिकडे बारबाला नाचवल्या जात होत्या, अश्लील नृत्य केले जात होते, पैसे उडवले जात होते. ही सगळी माहिती पोलीस रेकॉर्ड आणि एफआयआरमध्ये आहे. मला माहितीच्या अधिकारातंर्गत ही माहिती मिळाली. त्यामुळे ती खोटी असू शकत नाही. त्यानुसार धाड पडली तेव्हा बारमधील 22 बारबाला, 22 गिऱ्हाईक आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. माझा उल्लेख कदम यांनी ‘अर्धवट वकील’ म्हणून केला आहे. विधानसभेत मी अर्धवट वकील म्हणून बोलत नाही. विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो, ही माझी चौथी टर्म आहे. त्यामुळे मला विधानसभा नियम आणि कायदे चांगले माहिती आहेत. मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे अनिल परब यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=0ncajxr2_zw

संबंधित बातमी:

Anil Parab Vs Yogesh Kadam: आईच्या, बायकोच्या नावे डान्सबार काढून बायका नाचवता, लाज वाटत नाही का? अनिल परबांचा योगेश कदमांवर हल्लाबोल, पुरावे दाखवले!

आणखी वाचा

Comments are closed.