देशमुखांचे काळीज पिटाळून टाकणारे फोटो पाहून दमानियांचा कंठ दाटला, म्हणाल्या; कराडला व्हीआयपी

संतोष देशमुखवरील अंजली दमानिया, बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे फोटो एबीपी माझाचे हाती आले आहेत. काळीज पिटाळून टाकणारे फोटो पाहिल्यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ यांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान, हे फोटो पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एवढं होऊन सुद्धा वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं अंजली दमानिया एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या आहेत.

एवढ होऊन पण वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट – दमानिया

अंजली दमानिया म्हणाल्या, संतोष देशमुख यांचे हत्या करतानाचे फोटो पाहून त्यांच्या कुटुंबाला काय वाटतं असेल. त्यांना किती वेदना होत असतील. मी हे फोटो काल रात्री बघितले मला अख्खी रात्र झोप येत नव्हती. हे सर्व पाहून प्रचंड त्रास झाला. त्यामुळे कोणीही फोटो दाखवू नका, लोकांना फक्त सांगा काय झालंय. ही माणसं नाहीयेत, ही हैवाण आहेत. ज्यांना कुटुंब आहे, मुलं आहेत. भाऊ आहे, तो कोणीही असं करणार नाही. ही सगळ्याच्या पलिकडे गेलेली माणसं होती. सकाळी मी धनंजयशी बोलले तर ते म्हणाले ते ताई फोटो पाहणार नाही. तो माझा दादा होता. माय ब्रदर माय लाईफ, अशा नावाने त्याने संतोष देशमुखांचा फोन नंबर सेव्ह केला होता.  एवढ होऊन पण वाल्मिक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट देण्याची हिंमत होते. वाल्मिक कराडला जमिनीवर झोपवलं पाहिजे. स्पेशल जेवण, स्पेशल चहा मिळतो. दोन-दोन तास व्हिडीओ कॉलवर बोलतो. हे काय चाललंय? माझी पहिल्या दिवसापासून मागणी होती की वाल्मिक कराडला ऑर्थर रोड जेलमध्ये हलवा.


अशा प्रकारे परळीत अनेक हत्या झाल्या आहेत – जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड म्हणाले, अशा प्रकारे परळीत अनेक हत्या झाल्या आहेत. जे कधी रजिस्टरचं झाले नाहीत आणि पोलिसांनी कधी लक्षही दिलेलं नाही. जो चौकशी आयोग नेमलेला आहे. त्याचा परीघ वाढवला पाहिजे. महादेव मुंडेंच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी उपोषणाला बसलीये. तिच्या बाजूला दोन छोटे मुलं बसलेले आहेत. आम्ही मी आणि सुप्रियाताई भेटायला गेलो होतो. त्यामुळे दोन्ही मुलं प्रचंड रडत होती. आपल्याच मनात कालवाकालव होती. आपण अशांना न्याय देऊ शकत नसेल तर काय उपयोग आपल्या कामाचा…कलेक्टर, पोलीस यंत्रणा सर्व धनंजय मुंडेंची मग कारवाई कशी होणार आहे?



https://www.youtube.com/watch?v=x23yliyv12s

इतर महत्त्वाच्या बातम्या

Beed VIDEO : माझ्या भावाला खूप वेदना दिल्या, त्या हरामखोरांचं काय करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं; धनंजय देशमुखांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रिया, अश्रू अनावर

अधिक पाहा..

Comments are closed.