‘अण्णा विरोधात पोस्ट करणार नाही’ तरुणावर वाल्मिक गँगच्या दहशतीचा व्हिडिओ व्हायरल, अंजली दमानिया

बीड गुन्हा: ‘वाल्मिक अण्णाच्या विरोधात पोस्ट करणार नाही . माझी चूक झाली ‘ असे म्हणत तरुणाला दमदाटी करत हात जोडून माफी मागायला लावल्याचा प्रकार बीडच्या पांगरीमधून समोर आला आहे .हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे . वाल्मीक कराड कारागृहात असला तरी शहरात वाल्मीक कराडची गॅंगची मुजोरी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसतंय . यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे . (Anjali Damania)

काय म्हणाल्या अंजली दमानिया ?

वाल्मीक कराडची एक नाही अनेक टोळ्या आहेत . ही सगळी दहशत गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे .आताच्या घटकेला बीड पोलिसांनी यावर कडक ॲक्शन घ्यायला पाहिजे .आणि उलट आता प्रत्येक बीडकरांनी वाल्मीक कराडच्या विरोधात पोस्ट टाकली पाहिजे .यांना ठणकावून सांगितलं पाहिजे की असले सगळे धंदे आता बंद करा .ही दहशत आता आम्ही बीडमध्ये खपवून  घेणार नाही . असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या .

‘कुठलाही अण्णा आम्हाला आता मान्य नाही अशी पोस्ट प्रत्येक बीडकरांनी टाकली पाहिजे म्हणजे यांची डोकी ठिकाणावर येतील .जी अराजकता या गँगनी बीड शहरात माजवली आहे त्याला आळा घालण्यासाठी बीड करांनीच पाऊल उचलणं गरजेचं आहे . या सगळ्या लोकांना जोपर्यंत अटक करून आता टाकला जात नाही, जोपर्यंत यांना जेलची हवा खायला घातली जात नाही तोपर्यंत असंच चालू राहणार ‘ असल्याचं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ‘एबीपी माझा ‘ला सांगितलं .

नेमकं प्रकरण काय ?

‘पांगरी ग्रुपवर काहीही पोस्ट करणार नाही .वाल्मीक अण्णाच्या विरोधात कुठलीही पोस्ट करणार नाही .वाल्मीक अण्णा शिवाय पर्याय नाही .माझी झाली ती चूक झाली ‘ असे एका तरुणाला हात जोडून म्हणायला भाग पाडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . दरम्यान वाल्मीक गँगने तरुणाला हात जोडण्यासाठी शिवीगाळ केलेला आहे या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे .

या व्हिडिओमध्ये दमदाटी करणारे वाल्मीक कराडचे समर्थक असल्याची माहिती आहे .नेमका हा तरुण कोण होता याबाबतची माहिती अजून मिळू शकलेली नाही .हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे तसेच या दमदाटीच्या प्रकाराबाबत संबंधित तरुणाची कुठली तक्रार नोंदवली होती का ?हे अद्याप अस्पष्ट असले तरी वाल्मिक कराड आणि त्याच्या समर्थकांच्या दहशतीचा आणखी एक प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आल्याने शहरात भीतीच वातावरण आहे.

हेही वाचा

Beed Crime: वाल्मिक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, तरुणाला हात जोडायला लावत वाल्मिक गॅंगची दमदाटी

आणखी वाचा

Comments are closed.