कारला कट मारल्यानंतर अनमोलला संपवलं; माझं ऐकलं असतं तर…; ड्रायव्हरची धक्कादायक माहिती, नेमकं
सोलापूर : मंद्रूप (ता. सोलापूर) येथील भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कार्यकर्ते अनमोल केवटे (Solapur Crime News) खून प्रकरणी लातूर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून, शुभम पतंगे आणि वैभव स्वामी यांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी विष्णू मामडगे व त्याचा साथीदार मंथन मामडगे यांचा शोध घेण्यासाठी लातूर पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत. बुधवारी मध्यरात्रीनंतर खाडगाव रोड परिसरात गाडीला कट मारण्याच्या कारणावरून अनमोल केवटे आणि त्याची मैत्रीण सोनाली भोसले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला. यात अनमोलचा जागीच मृत्यू झाला, तर सोनालीवर उपचार सुरू आहेत. त्या घटनेपूर्वी आम्ही सावधगिरी बाळगली असती तर तो प्रसंग घडला नसता, अशी प्रतिक्रिया अनमोल केवटे यांचा कारचालक नवनाथ धाकपाडे याने व्यक्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची नवनाथ धाकपाडे यांनीच लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Solapur Crime News)
Solapur Crime News: अनमोलने ते न ऐकता समोरच्यांशी वाद घातला
घटनेच्या वेळी अनमोलचा कारचालक नवनाथ धाकपाडे सोबत होता. त्याने सांगितले की, कट मारल्यावर परिस्थिती चिघळू नये म्हणून स्वतःने कार मागे घ्यायची सूचना केली होती. मात्र, अनमोलने ते न ऐकता समोरच्यांशी वाद घातला. पुढे जीप कारच्या आडवी लावण्यात आली आणि आरोपींनी अनमोलवर प्राणघातक वार केले. त्यानंतर सोनालीलाही जखमी करण्यात आले. धाकपाडे यांनीच लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
Solapur Crime News: अनमोल केवटे शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचा दावा
या प्रकरणात चार जण सहभागी असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. आरोपी विष्णू मामडगे व त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या दोन पथकांना तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्य आरोपी विष्णू मामडगे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर आधीपासून काही गुन्हे दाखल आहेत. शुभम पतंगे आणि वैभव स्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. मृत अनमोल केवटे हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्ता असल्याचा दावा करत असे. तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीतही तो कार्यरत होता. शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबत त्याचे फोटो सोशल मीडियावर आहेत. मात्र, त्याच्यावर मारामारी, खंडणी वसुली यांसारखे पाचपेक्षा अधिक गुन्हे नोंदलेले असून, त्याला जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आले होते.
दारम येथे, जखमी सोनाली भोसाले मूळचे अँट्रोलीचे आहेत (ते दक्षिण सोलापूर) येथील असून विवाहित आणि आठ वर्षांच्या मुलीची आई आहे. गेल्या काही वर्षांपासून ती भ्रष्टाचार निर्मूलन समितीत सक्रिय आहे. लातूर मेळाव्यासाठी ती अनमोलसोबत आली होती. सध्या तिचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.