‘एवढी घमेंड बरी नाही…’; अनुष्का-विराटचं दिव्यांग फॅनकडे दुर्लक्ष, सुरक्षारक्षकांनीही ढकललं

अनुष्का शर्मा विराट कोहली ट्रोल होत आहे. बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा नवरा क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतात. इंडस्ट्रीतील पॉवर कपल्सपैकी एक असणाऱ्या विरुष्काचे (Virushka) फक्त देशातच नाहीतर, जगभरात चाहते आहेत. दोघे जिथे जातील तिथे त्यांच्या चाहत्यांचा गोतावळा त्यांच्याभोवती जमा होतो. सध्या असाच एक अनुष्का आणि विराटचा व्हिडीओ (Anushka Sharma Virat Kohli Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकऱ्यांनी दोघांनाही पुरतं जोडपून काढलं आहे. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात…

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये प्रेमानंद जी महाराजांच्या (Premanand Govind Sharan) आश्रमातील श्री हित कुंज, राधा केरळ इथे भेट दिल्यानंतर अनुष्का आणि विराट मुंबई विमानतळावर दिसतायत. भेटीदरम्यान ते चाहत्यांशी असभ्य वर्तन करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, हे सेलिब्रिटी जोडपं ट्रोलर्सचं लक्ष्य बनलंय.

अनुष्का-विराटला ट्रोल (अंष्का शर्मा विराट कोहली ट्रोल)

व्हायरल व्हिडीओमध्ये, विमानतळावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कडेकोट सुरक्षेत जात असल्याचं दिसतंय. दोघेही आपल्या कारकडे जात असतानाच, एक व्यक्ती ज्याला युजर्स दिव्यांग म्हणत आहेत, ती व्यक्ती विराट आणि अनुष्कासोबत फोटो काढण्यासाठी त्यांच्या दिशेनं येण्याचा प्रयत्न करताना दिसली. त्या व्यक्तीनं सेल्फी घेण्यासाठी रिक्वेस्टही केली, पण त्यांच्यावरच खिळलेले कॅमेरे, चाहत्यांची गर्दी आणि सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात हे सेलिब्रिटी कपल सेल्फी घेण्यासाठी अजिबात थांबलं नाही आणि आपल्या गाडीच्या दिशेनं निघून गेलं. त्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या दिव्यांग व्यक्तीला अक्षरशः बाजूला ढकललं, तर विराट कोहली आणि अनुष्कानं त्या व्यक्तीकडे पाहिलंही नाही आणि थेट गाडीच्या दिशेनं निघून गेले. दोघांच्या याच वर्तनामुळे खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

विराट-अनुष्कावर चाहते चिडले

एअरपोर्टवरच्या व्हायरल व्हिडीओनंतर अनेक युजर्सनी या जोडप्यावर ढोंगीपणा आणि असंवेदनशीलतेचा आरोप लावला आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की, ज्या व्यक्तीला जोडप्यानं इग्नोर केलंय, ती दिव्यांग व्यक्ती होती. एका युजरनं लिहिलंय की, “खूपच चुकीचं वागणं…”

दिव्यांग मुलाच्या सेल्फीच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून अनुष्का-विराट ट्रोल, लोक म्हणाले- 'एवढे अहंकारी असणे योग्य नाही'

आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय की, “बिचाऱ्यासोबत किती वाईट झालंय…” तर, दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, “वाटत तर नाही प्रेमानंद महाराजांना भेटून आलेत…” एक युजर म्हणतोय की, “एवढी घमेंड योग्य नाही…”, तर अजून एक युजर म्हणतोय की, “माहीत नाही अशा लोकांचे चाहते बनतातच का?”

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ankita Walawalkar On Dhurandhar Movie: ‘Views मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी…’; धुरंधरच्या ‘त्या’ ट्रेंडवरुन अंकिता वालावलकरची तळपायाची आग मस्तकात, काय म्हणाली?

आणखी वाचा

Comments are closed.