पर्यावरणविरोधी कोणतीही गोष्ट भाजपला विकास वाटतो, आदित्य ठाकरे यांनी लोखंडवाला तलावाला दिली भेट
सध्याचे सरकार इतके निसर्गविरोधी आहे की, पर्यावरणाच्या विरोधात असलेली कोणतीही गोष्ट भाजपला विकास वाटतो, अशी टीका शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित कोस्टल रोड कनेक्टरमुळे पाणथळ जागांचे होत असलेले नुकसान प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांनी आज दुपारी लोखंडवाला तलावाला भेट दिली. या भेटीनंतर X वर पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार हारून खान आणि मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या.
X पोस्ट करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, खारफुटी आणि तलावाचे आणखी नुकसान टाळण्यासाठी खांब (पियर्स) हलवावेत आणि गर्डर्सच्या लांबीचे अंतर वाढवावे, अशी सूचना आपण मुंबई महापालिकेला केली असल्याचे ते म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “सध्या ज्या ठिकाणी माती टाकली आहे, ती खांबांचे काम पूर्ण होताच काढून टाकण्याचे आणि ती जागा मूळ स्थितीत आणण्याचे आश्वासन महापालिकेने दिले. मात्र झालेले नुकसान भरून न येणारे आहे. दुर्दैवाने हे सरकार इतके निसर्गविरोधी आहे की, पर्यावरणाच्या विरोधातील कोणतीही गोष्ट भाजपला विकास वाटतो.” कंत्राटदाराकडून इतक्या मोठ्या प्रमाणात कांदळवनात भराव टाकला जात असतानाही वन विभागाला त्याची काहीच हरकत नाही, हे पाहून आश्चर्य वाटत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आज दुपारी, मी आमदार हारून खान जी आणि @mybmc LoP @KishoriPednekar जी यांच्यासमवेत लोखंडवाला तलावाला भेट दिली, BMC च्या प्रस्तावित कोस्टल रोड कनेक्टरमुळे पाणथळ प्रदेशांना काय नुकसान होत आहे ते पाहण्यासाठी.
खारफुटी आणि तलावाचे आणखी नुकसान टाळण्यासाठी मी बीएमसीला खांब हलवावे, गर्डरची लांबी वाढवावी असे सुचवले आहे.
त्यांनी या क्षणी जिथे माती टाकली आहे, त्यांनी ती काढून टाकण्याचे आणि पिअर पूर्ण होताच पुनर्संचयित करण्याचे आश्वासन दिले आहे.
नुकसान झाले तरी अपरिवर्तनीय आहे. खेदाची गोष्ट आहे की राजवट इतकी ग्रहविरोधी आहे की, पर्यावरणाच्या विरोधात कोणतीही गोष्ट भाजपने विकास मानली आहे.
@MahaForest देखील कंत्राटदाराने इतके खारफुटी भरून कसे ठीक आहे हे पाहून आश्चर्य वाटते.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 25 नोव्हेंबर 2026
Comments are closed.