नवी मुंबई विमानतळावरून आता जेद्दाहलाही जाता येणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) अवघ्या ११ महिन्यांत मोठा टप्पा गाठला आहे. विमानतळावरून आतापर्यंत ४० लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, येत्या १५ डिसेंबरपासून सौदी अरेबियातील जेद्दाह शहरासाठी नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी वाढ होणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ४१ लाख १ हजार ४०९ प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला आहे. यामध्ये ४० लाख ८८ हजार ८४० देशांतर्गत, तर १२ हजार ५६९ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे. प्रवासी वाहतुकीसोबतच नवी मुंबई विमानतळाने मालवाहतुकीच्या क्षेत्रातही आपली पकड मजबूत केली आहे. सध्या १८ मालवाहतूक विमान कंपन्यांच्या माध्यमातून २४ आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी विमानतळ जोडले गेले आहे. यामध्ये अॅमस्टरडॅम, फ्रँकफर्ट, हाँगकाँग, सिंगापूर, बाकू आणि अदिस अबाबा यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे.

Comments are closed.