पुण्यात न्यायालयाच्या दारात अराजकतेचा कळस, महाराष्ट्राचा तालीबान करायचा आहे का? – हर्षवर्धन सपकाळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

न्यायालयाच्या दारात गोळीबार होतो हे अराजकतेचे लक्षण असून गुन्हेगारांना कायद्याचे वा पोलिसांचे काही भय राहिलेले नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असतानाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ते मान्य करत नाहीत कारण त्यांना कशाचेही गांभिर्य नाही. फडणवीसांना महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा आहे का? असा संतप्त प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

हर्षवर्धन सपकाळ प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा मोठा गाजावाजा केला पण मागील १२ वर्षांपासून हा महामार्ग अजून पूर्ण झालेला नाही. या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून लाडक्या ठेकेदारासाठी १२ वर्षांपासून कोकणच्या जनतेला वेठीस धरले आहे. मुंबई गोवा महामार्ग हा नितीन गडकरी यांच्या नाकर्तेपणाचा उत्तम नमुना आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Comments are closed.