मदतीचा हात घेऊन पाठवलेला गौतमी पाटीलचा भाऊ कोण? कोणती मदत पाठवली, कोणती नाकारली? अपर्णा मरगळेंच


पुणे: गेल्या काही दिवसांपूर्वी नवले पूल परिसरात गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कारने रिक्षाला धडक  (Car Accident) दिल्याची घटना घडली, ज्यामध्ये एक जण जखमी झाला. या अपघातानंतर  (Car Accident) जखमी व्यक्तीच्या नातलगांनी गौतमी पाटीलवर (Gautami Patil) गंभीर आरोप केले असून, या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. तिला या प्रकरणात क्लीनचीट देखील मिळाली, त्यानंतर तिने पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवर खुलासा केला,त्यावेळी ती म्हणाली की,  मी तिथे उपस्थित नसताना देखील मला दोष देणं चुकीचं आहे. अपघात  (Car Accident) झाल्यानंतर मी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी माझे भाऊ पाठवले होते. मात्र, संबंधितांनी मदत नाकारली, या संबंधीचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी उपचाराचा खर्च करण्यास नकार दिला होता, हा आरोप चुकीचा आहे, त्यावरती आता अपघातग्रस्त रिक्षाचालकाच्या मुलीने याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Car Accident)

Gautami Patil:  गौतमी पाटील यांचा भाऊ कोण होता?

आमच्याकडे मदतीचा हात घेऊन पाठवलेला गौतमी पाटील यांचा भाऊ कोण होता? याचा गौतमी पाटील यांनी खुलासा करावा असा प्रश्न अपघातग्रस्त रिक्षाचालकाची मुलगी अपर्णा मरगळेने उपस्थित केला आहे. रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भावामार्फत मदत पाठवण्यात आली होती, असा दावा गौतमी पाटीलने पत्रकार परिषदेत केला होता. त्यांनी आमच्यापर्यंत मदतीसाठी गोष्टी पाठवल्या होत्या असं त्या म्हणाल्या. अपघातानंतर लगेचच त्यांनी दुपारी त्यांचा मानलेला भाऊ आमच्याकडे मदतीसाठी पाठवला होता. तो कोण होता ते पण त्यांनी स्पष्ट करावं, त्या म्हणाल्या त्यांनी आमच्याकडे सर्व मदत पाठवलेली होती, पण आम्ही त्या गोष्टी नाकारल्या. त्यांनी अशा कोणत्या गोष्टी पाठवल्या होता, आणि त्या आम्ही नाकारल्या तेही सांगावं, त्यांनी कोणत्या गोष्टी आम्हाला पाठवल्या होत्या हे मला आजतागायत आम्हाला कळलेलं नाही याचा गौतमी पाटील यांनी खुलासा करावा, असे आव्हान अपर्णा मरगळे यांनी दिलं आहे. गौतमी पाटील यांनी आमच्याप्रती सहानुभूती दाखवली असती तर आम्हीही टोकाची भूमिका घेतली नसती. त्यांची बदनामी करण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. मी त्यांना अजूनही सन्मानानेच बोलते, असेही अपर्णा मरगळे यांनी म्हटलंय.

Gautami Patil: देवदर्शनासाठी जातो म्हणून कार नेली…

गौतमी म्हणाली, देवदर्शनासाठी जातो म्हणून तिच्या कार चालकाने तिची गाडी नेली होती. त्यानंतर त्याच्याकडून तो अपघात झाला. अपघातानंतर त्याने पळून जाणे योग्य नव्हते. तो जे वागला ते चुकीचे आहे. मात्र, अपघातावेळी मी नसतानाही मला ट्रोल केलं जात आहे. ट्रोल होणं माझ्यासाठी काही नवीन नाहीये. मात्र, अशा प्रकारे मी तिथे उपस्थित नसताना देखील मला दोष देणं चुकीचं आहे. अपघात झाल्यानंतर मी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी माझे भाऊ पाठवले होते. मात्र, संबंधितांनी मदत नाकारली, या संबंधीचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे मी उपचाराचा खर्च करण्यास नकार दिला होता, हा आरोप चुकीचा आहे, अशी माहिती गौतमीने पत्रकार परिषदेत दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=Q8R3Q0ZD1T8

आणखी वाचा

Comments are closed.