अॅक्वा मेट्रोला हिंदुस्थानी रेल्वेच्या जनकाचा विसर
मुंबईचे आद्यशिल्पकार, थोर समाजसुधारक आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक जगन्नाथ शंकरशेट यांच्या नावाचा मुंबई अॅक्वा लाईनला सपशेल विसर पडला आहे. या मेट्रो मार्गिकेवरील मुंबई सेंट्रल येथील स्थानकाला जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव देऊनही तिकीट आणि सर्व तिकीट वेंडिंग मशीनवर ‘जेएसएस’ असा शॉर्टकट वापरला जात असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. या प्रकारामुळे मेट्रो प्रशासन थोर महापुरुषांचा अवमान करीत असल्याची तीव्र नाराजी मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि जगन्नाथ शंकरशेट ही आमची दोन्ही दैवते आहेत. त्यांच्या स्मरणार्थ रेल्वे आणि मेट्रो स्थानकांचे नामांतर करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही महापुरुषांच्या नावांचा उल्लेख सर्व ठिकाणी पूर्ण अक्षरांत झाला पाहिजे. आम्ही शिवप्रेमी आणि नानाप्रेमी जनता महापुरुषांचा अपमान कदापि सहन करणार नाही. – अॅडी. मनमोहन चोणक्कर, सरचिटणीस, नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठान
Comments are closed.