बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केले जात आहे?
निवृत्त शिक्षक, पत्नी अन् मुलामुलीचा मृतदेह आढळला
वृत्तसंस्था, ढाका
बांगलादेशच्या रंगपूर शहरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका बंद घरातून निवृत्त हिंदू शिक्षक, त्याची पत्नी, मुलगी आणि 12 वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. एकाचवेळी 4 मृतदेह मिळाल्याचे कळताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी याप्रकरणाचा विविध पैलू विचारात घेत तपास सुरू केला आहे.
ही घटना रंगपूर शहराच्या दासपारा (मछुआपारा) भागात घडली आहे. रंगपूर पोलीस स्थानकाचे प्रभारी नजमुल कादर यांच्यानुसार शनिवारी रात्री उशिरा 11.30 वाजता पोलिसांनी बंद घराचे टाळे तोडून चारही मृतदेह बाहेर काढले होते. मृतांमध्ये 65 वर्षीय गणपति चक्रवर्ती सामील असून ते रंगपूर जिल्हा शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. तसेच ते होमियोपॅथिक डॉक्टर होते. मृतांमध्ये चक्रवर्ती यांच्या पत्नी 50 वर्षीय प्रीतिलता यांचा समावेश आहे. तसेच 23 वर्षीय मुलगी आगामी चक्रवर्ती पार्थी हिचाही मृतदेह सापडला असून तिने चालूवर्षीच रंगपूर कारमायकल कॉलेजमधून एमएम पूर्ण पेले होते. 12 वर्षीय मुलगा प्रियम हा इयत्ता 5 वीचा विद्यार्थी होता.
वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह
पोलीस आणि फॉरेन्सिक टीमला घराच्या वेगवेगळ्या हिस्सांमध्ये मृतदेह पडलेले आढळून आले होते. जिन्यावर प्रीतिलता आणि मुलीचा मृतदेह होता. तर छतावर निवृत्त शिक्षक गणपति यांचा मृतदेह मिळाला आणि बेडखाली 12 वर्षीय प्रितमचा मृतदेह लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
गुरुवारपासून बंद होते मोबाइल
गुरुवारी दुपारपासून या परिवाराशी कुणाचाच संपर्क होऊ शकला नव्हता. प्रीतिलता यांची कनिष्ठ बहिण पूजा यांचे त्यांच्याशी गुरुवारी दुपारी अखेरचे बोलणे झाले होते. त्यानंतर परिवाराच्या चारही सदस्यांचे मोबाइल फोन सातत्याने स्विच ऑफ येत होते. शनिवारी रात्री नातेवाईक दासपारा येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले असता दारावर टाळे होते आणि आतील सर्व लाइट्स बंद होत्या. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
सीआयडी अन् डीबीकडून तपास
रंगपूर पोलीस, गुन्हेगारी तपास विभाग आणि डिटेक्टिव्ह ब्रँचने (डीबी) संयुक्तपणे या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अद्याप हत्येमागील कारण, वेण् अन् गुन्हेगारांचा शोध लागलेला नाहे. हिंदू परिवारातील सर्व सदस्यांच्या हत्येमागे धार्मिक कट्टरता कारणीभूत असू शकते असेही बोलले जात आहे.
Comments are closed.