देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू, आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी


आशिष देशमुख : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या काळात सर्वच राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तसेच काही नेते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. अशातच भाजप आमदार आशिष देशमुख यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना उघड धमकी दिली आहे. हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळं जास्त कराल तर कापून काढू अशी धमकी आशिष देशमुख यांनी दिली आहे.

आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित ही भाषा वापरली

दोन दिवसाआधी कळमेश्वर मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांला मारहाण झाली होती. त्यात काँग्रेसच्या उमेदवाराच्या पतीचे नाव पुढे आले होते. त्याला प्रतिउत्तर देताना आशिष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित ही भाषा वापरली आहे. सद्या नागपूर जिल्ह्यत आशिष देशमुख यांच्या या भाषणाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

कळमेश्वरची संस्कृती बिघडू नये अशी आमची भूमिका

कळमेश्वरची संस्कृती बिघडू नये अशी आमची भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजना कळमेश्वरमध्ये आणायच्या आहेत. आरोग्याच्या योजना आणायच्या आहेत असे आशिष देशमुख म्हणाले. येणाऱ्या दोन तारखेला प्रामाणिक आणि तुमच्यासाठी झटणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन आशिष देशमुख यांनी केले. आज कोणत्याही गावात गेले तर सर्वजण आपुलकीने जवळ येतात असे आशिष देशमुख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Nagpur Bjp : रेती माफियांना पक्षात घेतलं, भाजप पक्षश्रेष्ठीविरोधात आशिष देशमुखांची नाराजी; थेट सत्याग्रहाला बसण्याचा इशारा, तात्काळ पक्षप्रवेशाला स्थगिती

आणखी वाचा

Comments are closed.