शून्य आणि शून्य मिळून शून्य होतात, ठाकरे बंधुंच्या युतीवरुन आशिष शेलारांचा टोला

आशिष शेलार: महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नमनिर्माण सेना यांची युती होणार आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांनी तशी माहिती देखील दिली आहे. याबाबत भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारळ फुटण्यापूर्वी खाली कार्यकर्ते एकमेकांचं डोकं फोडतील अशी स्थिती असल्याचा टोला शेलारांनी लगावला आहे. शून्य आणि शून्य मिळून शून्य होतात असे शेलार म्हाले.

आवश्यकतेनुसार आम्ही जागा जाहीर करु

शिवसेना शिंदे गटासोबतच्या युतीवर देखील आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. आवश्यकतेनुसार आम्ही जागा जाहीर करु असे शेलार म्हणाले.  150+ हा आमचा आकडा ठरल्याचे शेलार म्हणाले. एकनाथ शिंदे आमचेही नेते आहेत, त्यांना पूर्ण सन्मान असल्याचे शेलार म्हणाले. भाजप आणि रिपाई आमची बैठक झाली आहे. उद्धव ठाकरे तुमचा महापौर कोणत्या मोहल्ल्यातून येणार असल्याचा टोला देखील शेलार यांनी लगावला.  तुम्हाला मननाणारा आणि अदित्य ठाकरेंना मानणारा गट वेगळा आहे. यावर पांघरुण उद्धव जी कधीपर्यंत घालणार? असा सवाल करत आशिष शेलार यांनी टीका केली.

अरविंद सावंत यांनाही लगावला टोला

सातारा जिल्ह्यातील सावरी ड्रग्ज साठा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvand Sawant) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहलं आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, असे सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे. संबंधित रिसॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्याने ते बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत एकनाथ शिंदे यांना पदावरुन पायउतार करण्यात यावे अशी मागणी सावंत यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. यावर देखील आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. अरविंद सावंत यांनी अमित शाह यांच्या चरणाशी येऊन बसावं, त्यांचा विश्वास आहे असे शेलार म्हणाले.

राज्यातील 29 महानगर पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं

राज्यातील 29 महानगर पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला यासाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

सावरी ड्रग्ज साठा प्रकरणी ठाकरेंच्या खासदाराचं अमित शाहांना पत्र, एकनाथ शिंदेंना पदावरुन बाजूला करण्याची मागणी, कोयना धरणाजवळील ‘रिसॉर्ट’ बेकायदेशीर असल्याचा दावा

आणखी वाचा

Comments are closed.