नराधम अशोक खरातने विद्यार्थिनींशीही गैरवर्तन केल्याचं उघड, भोंदूबाबाविरोधात 6 गुन्हे दाखल; आज न
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case) अधिकच गंभीर बनत असून, त्याच्याविरोधात एकूण 6 गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. नव्याने दाखल झालेल्या तीन तक्रारींमध्ये विद्यार्थिनींचाही समावेश असल्याने प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. धार्मिक विधी, लग्न जमवून देणे, भविष्य सांगणे अशा विविध बहाण्यांखाली महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने विद्यार्थ्यांशीही गैरवर्तन केल्याचे उघड झाले असून, नव्या तक्रारींमुळे त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती अधिक वाढत आहे. त्यामुळे पोलिसांकडून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. दरम्यान, अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असून, त्याला दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आज न्यायालयात पोलिसांकडून काय बाजू मांडली जाते आणि पोलीस कोठडीत किती वाढ होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: शिवनिका संस्थानच्या आर्थिक वर्तनाचा संशय
या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा म्हणजे मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर आला आहे. ऑडिट रिपोर्टनुसार, 2020 ते 2022 दरम्यान संस्थानचे उत्पन्न केवळ 4.90 लाखांच्या आसपास होते, तर 1.60 ते 1.64 लाख रुपयांची तूटही नोंदवली गेली होती.
मात्र, 2024 नंतर संस्थानच्या उत्पन्नात अचानक झपाट्याने वाढ झाली. तब्बल 76 लाख 91 हजार 416 रुपयांचे उत्पन्न नोंदवले गेले असून, खर्च वजा जाता 70.66 लाख रुपयांची शिल्लक राहिल्याचे दिसून आले आहे. याशिवाय, संस्थानची मालमत्ता 2022 मधील 96 लाखांवरून 2025 पर्यंत 1 कोटी 81 लाखांपर्यंत वाढली आहे. बँकेत 23 लाख 35 हजार रुपयांच्या मुदत ठेवी असल्याची माहितीही समोर आली आहे. या अचानक वाढलेल्या उत्पन्नाचा स्रोत काय, देणग्या कोणाकडून आल्या, याचा तपास आता केंद्रस्थानी आला आहे. पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: एसआयटी प्रमुखांचे आवाहन
दरम्यान, भोंदू अशोक खरातच्या गुन्ह्यांबाबत काही महत्त्वाची, उपयुक्त माहिती असल्यास खालील हेल्पलाईन नंबर्सवर संपर्क साधावा, आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन SIT पथकाच्या प्रमुख IPS तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
हेल्पलाइन क्रमांक: 9503270224, 7775816389.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.