अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने घातलेली आंघोळ; पडळकरांचा दावा, हादरवणारं कारणही सांगितलं!
Gopichand Padalkar On Jayant Patil Ashok Kharat Case: महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. काल (24 मार्च) नाशिक सत्र न्यायालयात खरातविरोधात सुनावणी पार पडली. सध्या एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. दरम्यान, अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात होते. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांचे फोटोही समोर आले आहेत. याचदरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर आरोप, काय म्हणाले? (Gopichand Padalkar On Jayant Patil)
सार्वजनिक कार्यक्रमातील फोटोला महत्त्व नाही, नेते मंडळी गेले तर काही नाही. मात्र, मठात जाणं, मंदिरात जाणं, पूजापद्धीतीचा अवलंब करणं हे घातक आहे. जयंत पाटील यांची देखील सखोल चौकशी व्हावी. जयंत पाटील त्यांच्या मुलाला देखील ईशान्येश्वर मंदिरात घेऊन गेले होते, असा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केला आहे. तसेच अशोक खरात ईश्वरपूरला गेलेला. यावेळी राजकीय करिअर करण्याच्या हेतूनं जयंत पाटील यांना रक्ताची आंघोळ घातलेली, असा खळबळजनक दावाही गोपीचंद पडळकरांनी एबीपी माझाशी बोलताना केला. तसेच ही आंघोळ माणसाच्या रक्ताने घातली की कुणाच्या रक्ताने घातली हे समोर आलं पाहिजे. नरबळी देखील अशोक खरातने दिलेत अशी चर्चा आहे, अशात नेमणं कोणाचं रक्त ते होतं, हे समोर आलं पाहिजे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
जयंत पाटील पुरोगामी, मग कशाला गेले होते?- गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar On Jayant Patil)
जयंत पाटील पुरोगामी आहेत, मग कशाला गेले होते, काय कारण आहे?, ते तर देवधर्म मानत नाहीत, मग कशाला गेले होते. महिला अत्याचारावर त्यांची काय भूमिका आहे? हे पण तपासायला पाहिजे. गर्भवती महिलांवर अत्याचार करणारा यांचा गुरू आहे. अशोक खरात पाटील यांच्याकडे पूजा घालतो, हे सगळ्या ईश्वरपूरला माहिती आहे. जयंत पाटील यांचा बुरखा समोर आला पाहिजे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.
अशोक खरातविरोधात 7 वा गुन्हा दाखल- (अशोक खरात प्रकरण)
अशोक खरातवर शिर्डीत आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरातविरोधात काल पीडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे. अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याची पीडित मुलीची तक्रार आहे. अशोक खरातनं गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे केली आहे. वाच्यता केल्यास दैवी शक्तीने आई-वडिलांना मारुन टाकीन अशी धमकीही दिली. जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान अशोक खरातने चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा, म्हणत पीडित तरुणीचे कुटुंब अशोक खरातकडे गेले होते. तिसऱ्या भेटीत मुलीनं कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, अशी विचारणा कुटुंबीयांकडून करण्यात आली. यावेळी पीडितेसोबत अशोक खरातने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.