भोंदू खरातचा निकटवर्तीय, शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके पत्नीसह अपघातात ठार; समृद्धी महामार्गावर कार कंटेनरखाली घुसली
महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि भीती घालून आर्थिक लूट करणारा भोंदू अशोक खरात याचा निकटवर्तीय, शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके हा शुक्रवारी भीषण कार अपघातात ठार झाला. त्याची पत्नी अनुराधा हिचाही मृत्यू झाला, गंभीर जखमी मुलावर उपचार सुरू आहेत.
सिन्नरच्या मिरगाव येथे अशोक खरात हा संस्थापक अध्यक्ष असलेले शिवनिका ट्रस्ट आहे, त्याचा उपाध्यक्ष जितेंद्र गणपत शेळके हा शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे टोयोटा हायरायडर कारने येत होता. समृद्धी महामार्गावर अहिल्यानगर जिह्यातील कोपरगावजवळील धोत्रे गाव परिसरात एक कंटेनर उभा होता. भरधाव वेगाने आलेली ही कार थेट कंटेनरखाली घुसली आणि हा भीषण अपघात झाला. जितेंद्र शेळके, त्याची पत्नी अनुराधा हे जागीच ठार झाले. मुलगा सुचित हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
शेळके खरातचा भागीदार
जितेंद्र शेळके हा खरातचा अनेक मालमत्तांमध्ये उघड व छुपा भागीदार होता. शिर्डीतील एका लॉन्समध्येही दोघांची भागिदारी आहे. शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष असल्याने खरातशी संबंध असलेल्या अन्य व्यक्तींबरोबर त्याचा संबंध होता.
अपघात, घात की आत्मघात
खरातशी असलेली जवळीक आणि व्यावहारिक संबंध यामुळे तपासी यंत्रणांनी शेळके याची चौकशी करून जबाब नोंदविले होते. खरातचा पाय जसजसा खोलात जात होता, तसतसा शेळकेही तणावाखाली होता. यातून त्याचे कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. कारमध्ये झालेल्या पिंवा हेतुपुरस्कर केलेल्या बिघाडामुळे कार नियंत्रित न झाल्याने ही घटना म्हणजे घातपाताचा प्रकार झाला का, अशी चर्चा आहे. खरात प्रकरणामुळे चौकशीचा ससेमिरा लागायला नको, कारवाई होईल, या भीतीतून शेळके याने स्वतःहून तणावाखाली कार कंटेनरखाली घुसवून स्वतः अपघात घडवून आत्मघातीपणा केला का, याबाबत तर्प-वितर्प वर्तविले जात आहेत.
Comments are closed.