कस्तुरी, जडीबुटी, बनावट रत्नाची खरेदी; अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट, पोलीस तपासाला नवे वळण
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात पोलीस तपासाला नवे वळण मिळालं आहे. आता या प्रकरणात एका बड्या आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. अशोक खरातने या दुकानातून हरिणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. नाशिकरोड परिसरातील एक ज्वेलरीही पोलिसांच्या रडारवर आहे. संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती आहे. अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे. (Ashok Kharat Nashik Case)
अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी- (Ashok Kharat Case)
अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता अशोक खरातविरोधात 10 वा गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज
अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे. गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला?, तपास यंत्रणांचा शोध सुरू आहे. शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अशोक खरात शिवनिका संस्थानचे बँक खाते सील- (अशोक खरात शिवनिका संस्थान)
अशोक खरातच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) मालमत्तेची माहिती मागवली असून अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास केला जाणार आहे. पुढील 2–3 दिवसांत तपासाला वेग येणार येईल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.