मला या जन्मात येऊन…; रुपाली चाकणकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय म्हणाल्या?

अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातला (Ashok Kharat) नाशिक पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर काल अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Ashok Kharat Nashik Crime News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ समोर आला. तसेच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर (Ashok Kharat And Rupali Chakankar) यांचे विविध कार्यक्रमातील फोटोही समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याचदरम्यान, रुपाली चाकणकरांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मला या जन्मात येऊन काय करायचं हे सांगणारे तुम्हीच, असं रुपाली चाकणकर बोलताना दिसत आहेत.

रुपाली चाकणकरांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय? (Rupali Chakankar Viral Video)

मला जन्म देणारी आई, म्हणून ती माझी गुरु…मला चालायला-बोलायला शिकवणारे वडील माझे गुरु..पण मी कोण आहे?, माझा जन्म कशाला झाला?, मला जन्मात येऊन करायचं काय?, हे सांगणारे तुम्ही गुरु…आज जे काही मी आहे…रुपाली चाकणकर म्हणून आहे, हे सर्व अस्तित्व तुमचं आहे, असं रुपाली चाकणकर एका कार्यक्रमात बोलल्या.

रुपाली चाकणकर फरार…रुपाली पाटील-ठोंबरेंची पोस्ट- (Rupali Patil On Rupali Chakankar)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil) यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर फरार…बजाव ताली…अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे. रुपाली पाटलांच्या या पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे.

NEMK केस घेते? (नाशिक अशोक खरात प्रकरण)

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका  35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातमी:

Ashok Kharat Nashik Crime News: डोक्यावर तांब्या ठेवला, महिला पाठमोरी उभी…; पुढे अशोक खरातकडून गैरवर्तन, आक्षेपार्ह व्हिडीओ समोर

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरात शनिवार, रविवारी फार्महाऊसवर यायचा…सेलिब्रिटी, व्हिआयपीसोबत मिटिंग; स्थानिकांनी काय काय सांगितलं?

आणखी वाचा

Comments are closed.