पेढा, नरबळी, रिव्हॉल्व्हरवर राजमुद्रा; अशोक खरातबाबत वकिलांची कोर्टात हादरवणारी माहिती, नाशिक
अशोक खरात प्रकरण नाशिक सत्र न्यायालय : महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला आज नाशिक सत्र न्यायालयात (Nashik Sessions Court) हजर करण्यात आले. अशोक खरातची आज पोलीस कोठडीची मुदत (Police Custody) संपली होती. त्यामुळे आज दुपारी 3.50 वाजता अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले, याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली. तसेच पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालाने अशोक खरातला 5 दिवसांची म्हणजेच 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
आज नाशिक अधिवेशन न्याल? (अशोक खरात नाशिक सत्र न्यायालय)
- अशोक खरात येण्याआधीच कोर्टरूममध्ये वकिलांची गर्दी (सुनावणी ऐकण्यासाठी)
- एसआयटीआधी किरणकुमार सुर्यवंशी सरकारी वकिल अजय मिसर कोर्टात दाखल
- कोर्टात आरोपींचा पुकारा झाला.
- अशोक खरात चा पुकारा करून 10 मिनिटे झाले तरीही अजून कोर्टात हजर नाही.
- पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. न्यायाधीशांनी दरवाजा जवळ उभ्या असणाऱ्या दुसऱ्या बाजूला यायला सांगितले. आरोपीच्या सुरक्षेच्या प्रश्नमुळे बाजूला केले.
- अशोक खरात कोर्टात येण्याआधी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई नाशिक कोर्टात दाखल झाल्या आहे. मला संधी मिळाली तर मी खरातच्या कानाखाली मारेल….तृप्ती देसाई यांचा इशारा.
- पोलिसांच्या गराड्यात 3.50 वाजता अशोक खरातला तोंडावर काळा कपडा बांधून नाशिक सत्र न्यायालयात आणण्यात आले.
- न्यायालयाने पुकरल्यानंतर 17 मिनिटांनी आरोपी अशोक खरात न्यायालयात हजर झाला.
- अधिकारी सुर्यवंशी गुन्ह्याची माहिती दिली.
- आरोपी खडे द्यायचा, पेढा खाऊ घालायचा पाणी प्यायला घ्यायाचा. त्यानंतर मळमळ व्हायची.
- पेढा कुठून, पाणी कुठून आणायचा, त्याचा शोध घ्यायचा आहे.
- आरोपीच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तुलच्या 5 रिकाम्या पुनगळ्या सापडल्या आहेत.ते कुठे फायर केले ते बघायचे आहे.
- आरोपी स्वतःला सिद्ध पुरूष सांगताच तो फसवणूक करायचा.
- आता अशोक खरातने किती महिलांची फसवणूक केली हे सांगायचे.
फिर्यादी कोण आहे? (अशोक खरात नाशिक सत्र न्यायालय)
- कॉस्मोलॉजीचा मला अभ्यास होता असे अशोक खरात सांगत होता. त्याच्याकडे काही सर्टिफिकेट सापडले आहेत.
- 6 लाख 53 हजार रोकड, लॅपटॉप मिळाले. काळ्या रंगाचे रिव्हॉल्व्हर, त्यावर राजमुद्रा आहे.
- 31 काडतुसे त्यात 5 फायर झाले ते कुठे फायर झाले? नरबळी दिलाचा संशय आहे.
- अशोक खरात हा 67 वर्षाचा आहे. तो 30 वर्षांच्या मुलींसोबत लैंगिक शोषण करत होता. यावरून त्याची मानसिकता काय लक्षात येते.
- फायर झाल्याने नरबळी दिल्याचा संशय आहे.
- वाघ, साप, नाग दाखवत होता ते कुठून आणले? जिवंत होते की नकली? त्याचा शोध घ्यायचा आहे.
- हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी दिली, त्याची हत्या केल्याचा संशय आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे.
- फॉरेस्ट अॅक्ट लागू शकतो. 7 दिवस पोलीस कोठडी द्यावी, व्याप्ती मोठी आहे.
अशोक खरात यांचे वकील कोण आहेत? (अशोक खरात नाशिक सत्र न्यायालय)
- 7 दिवसापासून तपास सुरू आहे.
- मोडस आणि काही व्हिडीओ जमा केले आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
- Dvr, लॅपटॉप मिळाले आहेत पैसे मिळाले रिव्हॉल्वर मिळाले असे म्हणतात.
- पण पेन ड्राईव्ह कुठे उल्लेख आला नाही.
- कोणते शोध आता बाकी नाही.
- जे द्रव्य पाजले गेले त्यासाठी pc वाढवून मागत आहेत.
- 7 दिवस रिमांड दिली आहे त्यामुळे पुन्हा रिमांड ची गरज नाही.
- अजून कोणते डॉक्युमेंट घ्याचे नाहीत,रजिस्टर ऑफिस मधून कागदपत्रे मिळू शकतात त्यामुळे रिमांडची गरज नाही.
अशोक खरातणे कुठे चड्डी घालत होते? (अशोक खरात नाशिक सत्र न्यायालय)
- युक्तिवाद सुरू असताना खरात मान खाली घालून उभा होता. आपले बोट बघत होता.
- कोठडी सुनवण्याआधी न्यायाधीश यांनी खरताल काहो बोलायचं आहे का विचारले. यावर मला साप वाघ या विषयी काही माहिती नाही, असं खरात म्हणाला.
- न्यायालायने 5 दिवसांची कोठडी सुनावली.
- 29 मार्चपर्यत अशोक खरातला पोलीस कोठडी.
अशोक खरातच्या विरोधात एकूण 6 फौजदारी गुन्हे दाखल- (Ashok Kharat Case)
महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरात याच्या विरोधात एकूण 6 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून 3 महिलांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती एसआयटीने दिली आहे. तक्रार करणाऱ्या तिन्ही महिला असून अशोक खरातने त्यांच्यावरही अत्याचार केल्याची महिलांची तक्रार आहे. इतर तक्रारी प्रमाणेच पँटर्न राबवित कुटूंबियांना केबिनच्या बाहेर काढून महिलांचे शोषण करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 6 तक्रारी दाखल असून यात 5 महिलांनी आणि एका पुरुषाने फिर्याद दिली आहे.
अशोक खरातची शिर्डीतही कोट्यावधींची मालमत्ता- (Ashok kharat Case)
भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची शिर्डीत कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं समोर आल्यानंतर आता त्याची काही उद्योग व्यवसायातही भागीदारी असल्याचं आता समोर आलं आहे. शिर्डीतील वॉटरपार्क शेजारी निमगाव शिवारात असणाऱ्या कोट्यावधीच्या मालमत्तेत हा भोंदूबाबा भागीदार आहे. 48 गुंठे परीसरात असणाऱ्या सिल्वर ओक या लॉन्समध्ये तो भागीदार आहे. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे बंधू महेंद्र शेळके यांच्या लॉन्समध्ये गुंतवणूक या भोंदूबाबाने केली आहे. शिर्डीत अनेक मालमत्ता असल्याची चर्चा असून या मालमत्ता त्याने कशा मिळवल्या याचीही चौकशी होणं गरजेचं आहे.
NEMK केस घेते? (नाशिक अशोक खरात प्रकरण)
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.