शिर्डी विमानतळापासून हाकेच्या अंतरावर पाच एकर प्लॉटची खरेदी, अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर

अशोक खरात प्रकरण: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण (Nashik Bhondubaba Ashok Kharat Case)  अधिक गंभीर वळणावर आहे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, जमिनी हडपणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे पोलीस यंत्रणांच्या हाती लागले आहेत. तसेच, खरातचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याचे काही फोटो आणि पूजा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिर्डीत अशोक खरातच्या नावावर असणारे दोन प्लॉट समोर आल्यानंतर आता काकडी शिवारातील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर पाच एकर प्लॉटची खरेदी केल्याचं देखील समोर आलं आहे.

शिर्डी विमानतळावर जाताना अशोक खरातला प्लॉट आवडला आणि त्याने खरेदी केला

भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. त्याने भोंदूगीरीच्या माध्यमातून मोठी मोहमाया देखील जमवल्याच समोर आलं आहे. शिर्डीत त्याच्या नावावर असणारे दोन प्लॉट समोर आल्यानंतर आता काकडी शिवारातील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या अंतरावर पाच एकर प्लॉटची खरेदी केल्याचं समोर आलं आहे. दोन वर्षांपूर्वी शिर्डी विमानतळावर जात असताना या ठिकाणचा प्लॉट आवडला आणि त्याने खरेदी केली असल्याची माहिती प्लॉट विकणाऱ्या विजय कोते यांनी दिली आहे. विशेष म्हणजे हेच काकडी गाव अशोक खरात यांचे आजोळ ( आईचे गाव ) असल्याचे देखील समोर आले आहे. साधारणतः वर्षभरापूर्वी या पाच एकर प्लॉट खरेदीचे साठेखत 64 लाख रुपयांन झालं असून प्लॉट NA ( बिगर शेती ) झाल्यावर अशोक खरात यांच्या नावावर होणार आहे. विजय कोते यांनी अशोक खरातला हा प्लॉटची विक्री केली होती. याबाबतची माहिती खुद्द विजय कोते यांनीच सांगितली आहे. शिर्डी विमानतळावर जाताना अशोक खरातला प्लॉट आवडला आणि त्यानं आजोळात प्लॉटची खरेदी केल्याची माहिती कोते यांनी दिली आहे.

अशोक खरात प्रकरणाचे विधी मंडळातही पडसाद

खरात आणि राजकीय नेत्यांचे लागेबंध काही लपलेले नाहीत. त्याचे अनेकांसोबतचे फोटो आणि पूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात अनेक राजकीय नेत्यांच्या विकेट पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विरोधक खरातचा एनकाऊंन्टर होण्याची भीती व्यक्त करत आहेत. त्याचवेळी विधी मंडळातही याप्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय गंभीर असल्याचे आणि योग्य ती कारवाईचे आश्वासन दिले आहे. आज समोर आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि शिंदे सेनेचे नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पाय खोलात असल्याचे म्हटले जात आहे. त्यांची लवकरच याप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.