रुपाली चाकणकरांनी सोमवती अमावस्येला अनामिका का कापलेली?; अंधारेंनी सांगितलं धक्कादायक कारण
रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणावर सुषमा अंधारे : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकमधील अशोक खरातप्रकरणी (Ashok Kharat) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे म्हणाल्या की, एका पीडितेने सांगितलं की, रुपाली चाकणकर देखील तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यावेळी रुपाली चाकणकरांनी स्वत:च्या हाताची अनामिका देखील कापली होती. 2 सप्टेंबर 2024 ला रोजी सोमवती अमावस्या होती. यादिवशीच रुपाली चाकणकरांनी हाताची अनामिका कापल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. तसेच सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांचे यादरम्यानचे फोटोही माध्यमांसमोर दाखवले. या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या हाताच्या अनामिकावर सफेद कापड गुंढाळल्याचं दिसून येत आहे. (Sushma Andhare On Rupali Chakankar Ashok Kharat Case)
रुपाली चाकणकरांनी अनामिका का कापली? (Rupali Chakankar Ashok Kharat Case)
रुपाली चाकणकरांवर अनामिका कापल्याचा आरोप करताना ते नेमकं का केलं?, याबाबतचा पुरावा देखील वाचून दाखवला. तंत्रमंत्र विद्येत अनामिका का कापतात?, याबाबतही सुषमा अंधारेंनी सांगितलं. अनामिका का कापतात?, हे मला माहिती नव्हतं. त्याबाबतची माहिती शोधली. त्यावेळी मला धक्कादायक कारण समजली. तंत्र-मंत्र विद्येत हाताची अनामिका (Ring Finger) अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषली जाऊ शकते. अनामिकेचे महत्त्वः ही बोट सूर्य (यश) आणि शुक्र (आकर्षण) यांच्याशी जोडलेली आहे, ज्यामुळे ती मंत्रोच्चाराद्वारे ऊर्जा प्रवाहित करण्याचे साधन बनते.
खरातची भाची रुपाली चाकणकरांच्या घरी राहते- सुषमा अंधारे (Sushma Andhare On Rupali Chakankar)
रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर होत्या. चाकणकरांचा घरात खरातची भाची राहते, असा दावाही सुषमा अंधारे यांनी केला. रुपाली चाकणकरांना तातडीने अटक करा, रुपाली चाकणकरांची समोरासमोर चौकशी झाली पाहिजे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अनेक महिलांचे लैंगिक शोषण झालं आहे. चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, हे सगळ करण्याअगोदर त्यांना त्या पदावरून काढलं पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली. रूपाली चाकणकर फरार होण्याअगोदर त्यांचा राजकीय दबाव वापरू शकतात. त्यांनी आपल्या पदाचा दुर्गोपयोग करत अनेकांवर दबाव आणला. काही पीडित म्हणतात, चाकणकर आम्हाला रात्री 2-2 वाजता धमकी देत होत्या. चाकणकर आणि कॅप्टन खरात यांच कोणत्यावेळी काय बोलण झालं हे समोर येण गरजेचं आहे. खरातने काही लोकांची मदत मागितली का? हे समोर येणं गरजेचं आहे. पोलिसांबरोबर आर्थिक गुन्हे शाखेने खरात आणि रुपाली चाकणकर यांचे संपत्तीचे स्रोत तपासले गेले पाहिजे. खरातची संपत्ती परदेशात देखील आहे.रुपाली चाकणकरांना तात्काळ ताब्यात घ्यावं, असं सुषमा अंधारेंनी सांगितलं. (Sushma Andhare On Rupali Chakankar Ashok Kharat Case)
NEMK केस घेते? (नाशिक अशोक खरात प्रकरण)
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद, काय काय म्हणाल्या? VIDEO
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.