खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली
अशोक खरात गुन्हे नाशिक : राज्यात सध्या चर्चेत असलेला नाशिकमधील (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok kharat) प्रकरण केंद्रस्थानी असून अशोकचे एकापेक्षा एक कारनामेही समोर येत आहेत. त्यातच, अशोक खरात (Ashok Kharat Crime Case)नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांच्या प्रकरणाबाबत आता धक्कादेणारा माहिती समोर आली आहे. राहाता येथील समता पतसंस्थेत 100, तर सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेत 32 खाती असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी या बाबत धक्कादायक माहिती देत कबुली दिली आहे.
अशोक खरातच्या प्रभावामुळे माझ्याकडून चूक झाली (Ashok Kharat Crime Case)
शिर्डी पोलिसांनी बँक खात्यांसंदर्भात चौकशी केली असतासर्व 32 खात्यांना अशोक खरात नॉमिनी असल्याचे पुढे आले आहे. तर या 32 खात्यांमध्ये 2 कोटी 74 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचीहे माहिती आहे. अशोक खरात याने स्वतः सगळी कागदपत्र देऊन खाती उघडली. सोबतच खरात याद्वारे सर्व खात्यांची जबाबदारी घेतली होती, अशी देखील माहिती आहे. मात्र ज्यांच्या नावाने खाती उघडली गेली, त्यांचा आणि पतसंस्थेचा कधीच प्रत्यक्ष संबंध आला नाही. अशोक खरात यांनीच पैसे टाकले आणि कालांतराने काढून घेतले. अशोक खरातच्या प्रभावामुळे माझ्याकडून चूक झाली. अशी कबुली आता जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांni दिली आहे.
पंतसंस्थेच्या अनेक खात्यांमध्ये खरात वारसदार- (Ashok Kharat Case)
कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा दोन नावांनी खाते असल्याची माहिती आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.