भोंदू खरातवर महायुती सरकारची मेहरबानी? मंत्री जयकुमार रावलांना प्रश्न विचारताच काढला पळ

अशोक खरात गुन्हे नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत. अशातच, भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat)  ज्या ठिकाणी विकृतीचा कळस गाठला, त्याचं बांधकाम हे सरकारी खर्चातून झालं. धक्कादायक म्हणजे पर्यटनाचा निधी मंदिरासाठी दिल्याचा आरोप करत खरात सरकार पुरस्कृत बाबा आहे. असा दावा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विजय कुंभारांनी केलाय. नाशिकच्या मिरगावमधील श्री सिद्धेश्वर इशानेश्वर देवस्थानला 105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. भोंदू अशोक खरातवर महायुती सरकारची देखील मेहरबानी करण्यात आली असून 2018 चा GR देखील समोर आला आहे. किंबहुना तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal) यांच्याकडून दिड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे बोललं जात आहे.

अशातचमंत्री जयकुमार राओलन यांनी कॅप्टन खरात यांना विचारले प्रश्नni उत्तर द्या नाही देते काढता पाय घेतलाय. . . . जयकुमार राव पर्यटन मंत्री असताना कॅप्टन खारा यांच्यासाठी निधी देण्यात आला. खरातच्या संस्थानाला दीड कोटींचा निधी दिला होता. खरात प्रकरणावर प्रश्न विचारताच मंत्री रावल हे कुठलीही अभिप्राय नाही देते विधीमंडळ पायऱ्यांवरून निघून गेले आहेत्यामुळे.

Vijay Kumbhar : ज्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींचं शोषण, त्या ठिकाणासाठी सरकारने निधी पुरवला

दरम्यान, राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंदिराचं काम पूर्ण केल्याची माहिती आहे. यात सभामंडप बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे, महिला व पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्तनिवास बांधकाम, विद्युतीकरण व लैंडस्केपिंग करता निधी मंजूर केल्याची बाब सध्या उघडकीस आली आहे. शिवाय या संबंधित 31 मार्च 2018 रोजी होयआर देखील काढण्यात आला आहे. दुसरीकडेपर्यटन विभागाने 31 मार्च 2018 ला हा निर्णय घेतला आणि त्या वर्षी 25 लाखांचा निधी देण्यात ही आला. हे काम मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचं असं त्यात नमूद आहे. असा दावा करत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांनी पुरावे सादर केलेत. म्हणजे ज्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींचं शोषण झालं, त्यासाठी सरकारने निधी पुरवला. असा आरोप करत सरकार खरातवर कशी खैरात करत होतं, हे कुंभारांनी पुराव्यानिशी मांडण्याचा प्रयत्न केलाहे.

Ashok Kharat Property: अशोक खरातच्या नाशिकमधील मालमत्ता

1. पाथर्डीत 150 कोटींची 30 एकर जमीन
2. सिन्नरच्या कहांडळवाडीत 5 कोटींची 45 एकर जमीन
3. पाथर्डी, गौळणे 30 कोटींच्या जमिनी
4. सिन्नरमध्ये 1 कोटींचे व्यापारी गाळे
5. मीरगावातील फार्म हाऊसची किंमत 10 कोटींच्या घरात
6. अहिल्यानगरमध्ये 5 एकरांचा भूखंड
7. ओझर विमानतळाजवळ 5 एकर जमीन
8. जानोरी, दहावा मैल भागात मोक्याच्या ठिकाणी जमिनी
९. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात कार्यालय
10. कर्मयोगीनगरमध्ये 5 कोटींचा बंगला
11. शिर्डीच्या पानमळ्यात 30 गुंठे जागा
12. निघोजमध्ये 4 एकर जागा
13. शिर्डीत 70 कोटींच्या जमिनी, प्लॉट
14. सिन्नरमध्ये मोक्याच्या जागांवर दुकाने

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.