पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भप
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला आज (2 एप्रिल) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर अशोक खरातला काल (1 एप्रिल) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तपास अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचाऱ्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळण्याची विनंती अर्ज सादर केला होता. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर अशोक खरात ला मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेतले. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
पूजाविधीच्या बहाण्याने तसेच लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2013 पासून महिलेच्या लग्ना अधिनपासून असलेल्या ओळखीचा फायदा अशोक खरातने घेतला. जे विवाह स्थळ आले, त्याच्याशी सुखी संसार होईल का? अशी विचारणा करण्यासाठी पिढीत महिला आई-वडिलांसोबत पहिल्यांदा 2013 मध्ये अशोक खरातकडे गेले होते. त्याने सुखाचा संसार होईल असे सांगत इशानेश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्यासाठी सांगितले. महिलेला दोन आपत्य झाले. मात्र काही दिवसांनी घरगुती भांडणे टोकाला गेल्याने पतिपत्नी विभक्त झाले. त्यानंतर पुन्हा पिढीत महिला आई-वडिलांसोबत खरातकडे भविष्यबाबत मार्गदर्शन ऐकण्यासाठी गेले. तेव्हापासून नराधमाने महिलेवर वाईट नजर टाकायला सुरवात केली. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार- (Ashok Kharat Case)
पुढच्या वेळी महिला अशोक खरातकडे गेली असता त्याने लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर महिला स्पर्धा परीक्षाच्या तयारीसाठी दिल्लीला गेली. मात्र मुलांच्या भविष्याच्या काळजीमुळे पुन्हा नाशिकला परतली. पुन्हा खरातचे मार्गदर्शन घेण्यासाठी गेली असता त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरवात केली. तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार केले. तुझा घटस्फोट लिखित होता. तू मागिल जन्माची अप्सरा आहे. मी अवतारी पुरूष आहे. माझे दोन विवाह होणार आहेत, दुसरा विवाह तुझ्याशी होणार असे सांगून पिढीतेवर अत्याचार केले. महिला प्रेग्नंट राहिल्याने त्याने गर्भपातच्या गोळ्या खाऊ घालून महिलेचा गर्भपात केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भोंदू अशोक खरातने गोळ्या कुठून आणल्या कोणता डॉक्टर आणि मेडिकल दुकानदार त्याचा नियमित संपर्कात होता, विशिष्ट डॉक्टरकडून गर्भपातचे औषध तो घेत होता का महिलांना कोणत्या डॉक्टरकडे पाठवीत होता का?, या दृष्टीने तपास केला जाणार असून खरातच्या संपर्कातील डॉक्टरही रडारवर येणार आहेत. त्यामुळे आज न्यायालयात काय होते यांकडे सगळ्यांचं लश्र लागलं आहे.
अशोक खरातच्या समोर पुजारी, CA, सराफा व्यावसायिकाला बसवलं (Ashok Kharat Case)
एसआयटीकडून अशोक खरातची काल पुण्याचा सीए, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफाला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. एसआयटीनं चौघांची सहा तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. या चौकशीतून खडे, रत्न सोन्याच्या बदल्यात अशोक खरात बनवाबनवी करत असल्याची माहिती समोर आली. तसेच पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्जप्रकरणाचीही माहिती चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. एका बँकेचा मॅनेजर आणि इतरांना मिळून अशोक खरातने एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा एसआयटीला संशय आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या सोन्यच्या किंमतीत खरेदी-विक्रीमध्ये लाखोंचा नफा मिळवल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.