Ashok Kharat: अशोक खरातला कोर्टात नेताना पोलिसांकडून त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो; तृप्ती देसाईंचा
अशोक खार्त गुन्हे बातम्या: अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याचा पोलिसांकडून एन्काऊंटर (Police Encounter) केला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केला आहे. अशोक खरात याचे अनेक बड्या राजकारण्यांशी लागेबांधे आहेत. हे संबंध समोर येऊ नयेत म्हणून अशोक खरात (Ashok Kharat) याला संपवले जाऊ शकते, अशी शक्यता तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवली. त्या शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी तृप्ती देसाई यांनी केलेल्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Maharashtra Crime news)
अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत त्याचे अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबतचे फोटो समोर आले आहेत. अशोक खरात याचे अनेक मंत्री आणि राजकारण्यांशी संबंध आहेत. त्यामुळे अनेकांचे पितळ उघडे पडू शकते. हे संबंध कधी समोर येऊ नयेत, यासाठी अशोक खरात याला संपवण्याचा डाव असू शकतो. मला नाशिकमधील काही लोकांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की, अशोक खरात याला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 24 तारखेला त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. त्यावेळी कोर्टात नेत असताना अशोक खरात चकमकीत किंवा झटापटीत मारला गेला, अशा पद्धतीने एन्काऊंटर केला जाऊ शकतो, अशी शक्यता तृप्ती देसाई यांनी बोलून दाखवली.
अशोक खरात याला काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती. याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. आयपीएस तेजस्वी सातपुते या पथकाचे नेतृत्व करत आहेत. शनिवारी दुपारी अशोक खरात याला चौकशीसाठी कार्यालयात आणण्यात आले होते. त्यानंतर तब्बल सात तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून कोणती माहिती समोर येणार, हे बघावे लागेल.
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्यासोबत लागेबांधे आढळून आले होते. अशोक खरातने उभारलेल्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये त्या सदस्य होत्या. याशिवाय, रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्या डोक्यावर छत्री धरताना आणि त्याचे पाद्यपूजन करतानाचे फोटो समोर आले होते. यावरुन टीकेची प्रचंड झोड उठली होती. या सगळ्यानंतर रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.