अशोक खरातच्या बँक खात्यांचे ‘ते’ गूढ रहस्य काय? विशिष्ट तारखेला उघडली अनेक अकाऊंटस्; पोलीसही चक
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: अंधश्रद्धा, हवाला रॅकेट आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांनंतर आता भोंदू अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat Case) एक नवीन आणि अत्यंत रहस्यमय वळण समोर आले आहे. खरातने विविध पतसंस्थांमध्ये आपली खाती उघडताना एका ‘विशिष्ट तारखेचा’ वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, आता या तारखेमागील नेमके रहस्य काय? याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: एकाच दिवशी अनेक पतसंस्थांमध्ये खाती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने एकापेक्षा जास्त पतसंस्थांमध्ये आपली बँक खाती उघडली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ही सर्व खाती एकाच विशिष्ट तारखेला उघडण्यात आली आहेत. ज्या तारखेला ही खाती उघडली गेली, त्या तारखेचे खरातच्या आयुष्यात किंवा त्याच्या आर्थिक साम्राज्यात काय महत्त्व आहे? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: पतसंस्था आणि बँका एसआयटीच्या रडारवर
जी तारीख समोर आली आहे, ‘त्या’ तारखेला खरातने खाते उघडले आहे का? याबाबतची सर्व माहिती पोलिसांनी काही पतसंस्थाकडून मागवली आहे. पतसंस्थांच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता अनेक पतसंस्था आणि बँकांचे आर्थिक व्यवहार पोलीस यंत्रणांच्या रडारवर आल्याचे दिसून येत आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: खरात तब्बल 132 बँक खात्यांचा नॉमिनी
दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. खरात हा तब्बल 132 बँक खात्यांचा नॉमिनी असल्याचे उघड झाले असून, त्यापैकी 100 खाती राहाता येथील समता पतसंस्थेत तर 32 खाती सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेत असल्याची माहिती आहे.
या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले असून, केवळ 32 खात्यांतच सुमारे 2.74 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ही खाती संबंधित व्यक्तींच्या नावावर असली तरी त्यांचा पतसंस्थेशी प्रत्यक्ष संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व व्यवहार अशोक खरातच करत असल्याचेही उघड झाले आहे. जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनीही खरातच्या प्रभावामुळे चूक झाल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली आहे. दरम्यान, समता पतसंस्थेतील 100 खात्यांमधून तब्बल 60 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.