‘स्पॉट व्हिजिट’साठी 5 लाख घ्यायचा, अमावस्या-पौर्णिमेला भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा, भोंदूबाबाल
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अटकेनंतर आता त्याच्या आर्थिक साम्राज्याचे एकेक पदर उलगडू लागले आहेत. एसआयटी (SIT) कडून सुरू असलेल्या चौकशीत खरातने भक्तांच्या श्रद्धेचा बाजार मांडून त्यांना कोट्यवधी रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे. केवळ ‘स्पॉट व्हिजिट’साठी हा भोंदूबाबा 5 लाख रुपयांपर्यंत फी आकारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: महागड्या गाड्यांचा शौक आणि 5 लाखांची ‘व्हिजिट’
अशोक खरात हा भक्तांच्या मानसिकतेचा पूर्णपणे फायदा घेत होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, लोकांच्या घरी, कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वास्तू पाहण्यासाठी जाण्यासाठी तो तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत आकारणी करत असे. भेटीसाठी जाण्यासाठी तो स्वतःच्या नव्हे, तर भक्तांच्या महागड्या गाड्यांची मागणी करत असे. विशेष म्हणजे, काही भक्तांनी त्याला महागड्या गाड्याच भेट म्हणून दिल्याचा संशय असून त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: अमावस्या-पौर्णिमेला भाविकांची मोठी रांग
खरातच्या दरबारात अमावस्या आणि पौर्णिमेला भक्तांची तुफान गर्दी व्हायची. मात्र, या गर्दीतही त्याने आर्थिक भेदाभेद केला होता. जो भक्त जास्त पैसे देईल, त्याला दर्शनासाठी प्राधान्य दिले जात असे. रात्री उशिरापर्यंत हा दरबार सुरू असायचा. अशोक खरातने काही भक्तांकडून तब्बल 20 लाखांपर्यंत खर्च करवून घेतल्याची माहिती समोर येत आहे.
Ashok Kharat: चार एकर भूखंड खरेदी प्रकरणी भोंदू अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा
दरम्यान, शिर्डीतील चार एकर जमिनीच्या खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरात याच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ जमीनमालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांचा समावेश आहे.
आरोपींनी कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. फसवणूक आणि सावकारकी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व व्यवहारांची एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून, शिर्डीत खरातची कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.