अशोक खरातकडे मागितली 5 कोटींची खंडणी, नकार देताच ऑफिसबॉयने पीडित महिलांना धमकावले, पण ‘तो’ व्हि
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात आता एकामागोमाग धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, खंडणीच्या पैशांवरून सुरू झालेला वाद अखेर संपूर्ण रॅकेट उघडकीस येण्याचे कारण ठरल्याचे तपासात समोर येत आहे.
तपासानुसार, खरातच्या कार्यालयातून महिलांवरील अत्याचारांचे व्हिडिओ चोरल्यानंतर संशयित ऑफिसबॉय नीरज जाधव याने सुरुवातीला खरातलाच ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या क्लिप्सच्या बदल्यात त्याने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती आहे. मात्र, खरातने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर नीरजने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवला.
Ashok Kharat Nashik Crime News: ऑफिसबॉयने पीडित महिलांना धमकावले
शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेला मॉर्फ फोटो आणि व्हिडिओ पाठवून धमकावण्यात आले. इतकेच नव्हे तर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या या महिलेला प्रत्यक्ष गाठून तिला व्हिडिओ दाखवत दबाव टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने ही बाब अशोक खरातला सांगितली; मात्र स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याने तिलाच पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला.
Ashok Kharat Nashik Crime News: ‘तो’ व्हिडीओ ठरला टर्निंग पॉइंट
दरम्यान, खरातकडून अपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता संपल्यानंतर नीरजने आणखी एक पाऊल पुढे टाकत सिडको परिसरातील एका विवाहितेचा व्हिडिओ तिच्या मेहुण्याला पाठवला. हाच व्हिडिओ या प्रकरणातील टर्निंग पॉइंट ठरला. कुटुंबीयांनी धीर दिल्यानंतर संबंधित महिलेनं सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आणि संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला.
Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरात यांचे 100 Peksha Jast Videos
या प्रकरणात अशोक खरातवर महिलांना धार्मिक व तांत्रिक विधींचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत. तर नीरज जाधवने या अत्याचारांच्या व्हिडिओंचा वापर करून ब्लॅकमेल आणि धमकावण्याचा डाव रचल्याचा संशय आहे. या प्रकरणात सुरुवातील 58 व्हिडीओ समोर आल्याची माहिती होती. मात्र, आता या प्रकरणात महिला अत्याचाराचे 100 हून अधिक व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून त्यांनी नाशिकमध्ये दाखल होत खरातची सखोल चौकशी केली आहे. तसेच नीरज जाधवला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे.
Who Is Ashok Kharat: कोण आहे अशोक खरात?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.