पिस्तूल, काडतूस…अशोक खरातच्या फार्म हाऊसवर क्राईम ब्राँचचा छापा; काय काय सापडलं?
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे.
अशोक खरात प्रकरणाची राज्य सरकारकडून दखल- (Ashok Kharat Nashik Crime News)
अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरणी एसआटीची स्थापन केली आहे. तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे एसआटी प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एसआटी स्थापन झाल्याने अशोक खरातचे आणखी कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलिसांनी याधी अशोक खरातच्या घराची झाडाझडती केली.
अशोक खरात फार्म हाऊसवर गुन्हे शाखेने छापा टाकला- (गुन्हे शाखेने अशोक खरात फार्महाऊसवर छापा टाकला)
अशोक खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर रात्री उशिरा क्राईम ब्राँचने छापा टाकला. यावेळी अशोक खरातच्या मिरगाव मधीलफार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले आहे. अशोक खरातच्या मालमत्ता आणि अन्य काही महत्त्वाचे कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अशोक खरातच्या फॉर्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केलं. पिस्तूल आणि काही वापरलेले तर काही न वापरलेले काडतूस देखील पोलिसांना सापडल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.
कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
NEMK केस घेते? (नाशिक अशोक खरात प्रकरण)
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.