कॅप्टन खरातच्या कुकर्माचा पेटारा उघडला, 100 पेक्षा जास्त व्हिडीओ, घरच्यांना 2 लॅपटॉप, पिस्तुल आ
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत असून, महिलांच्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या व्हिडिओंमधून ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचे समोर येत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुमारे दीड तास आढावा बैठक घेतली. या SIT मध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील 12 हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर कॅप्टन खरात याने महिला अत्याचार केल्याचे 100 हुन अधिक व्हिडीओ असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: दोन लॅपटॉप, सुमारे 8 लाखांची रोकड जप्त
दरम्यान, पोलिसांनी कॅप्टन खरातच्या विविध ठिकाणी छापेमारी करत महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. झाडाझडतीदरम्यान दोन लॅपटॉप, सुमारे 8 लाखांची रोकड, एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. जरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी या घडामोडींमुळे प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज : अशोक खरातवार तीन गुन्हे दाखल
या व्हिडिओंचा संबंध शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवशी असल्याचा संशय असून, त्यानेच हे फुटेज काढल्याची शक्यता तपासात पाहिली जात आहे. सध्या कॅप्टन खरातविरुद्ध दाखल तीन गुन्ह्यांचा तपास वेगाने सुरू आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा, वावी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा, तर शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील फोटो व्हायरल केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान खरातने अंकशास्त्र आणि भविष्यकथनाच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध निर्माण करून मोठी संपत्ती उभी केल्याचेही समोर आले आहे. नाशिकमध्ये आलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, तसेच पाथर्डी परिसरातील सुमारे 30 एकर जमीन आणि इतर ठिकाणी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.
Who Is Ashok Kharat: कोण आहे अशोक खरात?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.