तथाकथित अंकशास्त्रज्ञ अन् राजकीय वर्तुळात वावर; वासनांध कॅप्टन अशोक खरातकडे कोट्यवधींचं घबाड
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) यानं एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी अशोक खरातला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. पोलिसांच्या तपासात आता अनेक धक्कादेणारा शोषण पुढे येऊ लागले आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील एका पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाले आहेत. यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.
Nashik Crime News : आलिशान फार्म हाऊस, व्हिआयपी सोबत फार्महाऊसमध्ये मिटींग
दुसरीकडेकॅप्टन अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्या मालमत्ताचा शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे. सिन्नर तालुक्यातील ईशानेशवर मंदीर जवळच अशोक खरातचा आलिशान फार्म हाऊस आहे. तिथे शनिवारी, रविवारी तो येत असे, त्याच बरोबर, कोणी सेलिब्रिटी, व्हिआयपी आलेत तर त्यांच्या सोबत फार्महाऊसमध्ये मिटींग करत असल्याची स्थानिकांची माहिती आहे. या व्यतिरिक्त इतर शहरात देखील त्याची कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचा पोलिसांनी संशय असून या मालमत्तेचा शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे.
Ashok Kharat : 15 वर्षात तब्बल 200 कोटींची माया
लष्करी शिस्त अन् सेवेच्या नावाखाली वावरणाऱ्या कॅप्टन अशोककुमारने अंकशास्त्राच्या आधारे राजकीय नेतेमंडळींचंच नव्हे तर प्रशासनातील बडे अधिकारी, खाकी वर्दीतील वरिष्ठांचं भविष्य सांगितलं. यातून त्याने मागील 15 वर्षात तब्बल 200 कोटींची माया जमवली. त्याचे पुरावे एका मराठी वृत्तपत्राने शोधून काढले आहेत. त्याने विविध मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी विकत घेऊन ठेवल्याचं समोर आलं आहे.
अशातचस्वघोषित कॅप्टन अशोक खरातच्या मिरगावमधील फार्म हाऊसवर रात्री उशिरा क्राईम ब्रँचद्वारे छापा घातला आहे. खरातच्या मिरगाव मधीलफार्म हाऊसमधून महत्त्वाचे दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले आहे. खरातच्या मालमत्ता आणि अन्य काही महत्त्वाचे कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर खरातच्या फॉर्म हाऊसमधून एक पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केलं आहे. एक पिस्तूल आणि काही वापरलेले तर काही न वापरलेले काडतूस देखील पोलिसांना सापडल्याची माहिती पोलिस सूत्रेni दिली आहे.
Nashik Crime : अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजकांनाही मार्गदर्शन
दरम्यान अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात दरम्यान, खरातद्वारे मागील 15 वर्षात तब्बल 200 कोटींची माया जमवली. त्याचे पुरावे एका मराठी वृत्तपत्राने शोधून काढल्याचा दावा केला आहे. त्याने विविध मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी विकत घेऊन ठेवल्याचं समोर आलं आहे. ज्यामध्ये पाथर्डीत सर्व्हे क्रमांक 132, 138, 203, 220, 33, 93, 97 मध्ये 30 एकर जमीन आहे. याची अंदाजे किंमत 150 कोटींच्या आसपास आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही जमीन आहे. तसेच कहांडळवाडी, मीरगाव येथे त्याची 45 एकर जमीन असून याची किंमत 2 कोटींच्या आसपास असल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
Comments are closed.