तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता प्रत्येक दिवशी नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याचा आरोप आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) सध्या खरातची चौकशी सुरु आहे. शनिवारी एसआयटीने अशोक खरात (Ashok Kharat) याची तब्बल दहा तास कसून चौकशी केली. ही चौकशी सुरु असताना अशोक खरात याची बोलती बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशोक खरात याची एसआयटीकडून कोठडीत चौकशी सुरु असताना एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. त्यावर अशोक खरात याची बोलतीच बंद झाली. तो तेजस्वी सातपुते यांच्यासमोर मान खाली घालून नुसताच उभा होता, असे समजते. एसआयटीकडून शनिवारी अशोक खरात याच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयाचीही सलग तिसऱ्या दिवशी झाडाझडती घेण्यात आली. याशिवाय, पीडित महिलांना घटनास्थळी नेऊन स्पॉट पंचनामा करण्यात आला. यावेळी सीन रिक्रिएशन करण्यात आले. अशोक खरात आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची माहिती जुळते की नाही, हे एसआयटीने पडताळून पाहिले. या गुन्ह्याचे सूक्ष्म वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींची पोलिसांकडून खातरजमा करण्यात आली. अशोक खरात याच्या केबिनबाहेर एकाचवेळेस किती लोक थांबू शकतात, एकजण आत गेल्यावर किती वेळाने दुसऱ्याचा नंबर लागायचा, महिला किंवा पुरुष आतमध्ये आल्यावर अशोक खरात नेमकं काय करायचा, याची सगळी माहिती पोलिसांनी स्पॉट पंचनाम्यावेळी पीडित महिलांकडून घेतल्याचे वृत्त ‘दैनिक लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे.
अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपत असून त्याला आज नाशिकच्या न्यायालयात हजर केले जाईल. अशोक खरात याच्याविरोधात काही महिलांकडून नव्याने गुन्हे दाखल केल्याने पोलिसांकडून अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून मागितली जाण्याची शक्यता आहे.
Nashik Crime news: अशोक खरातची ‘ओन्ली कॅश पेमें’टची स्ट्रॅटेजी, पोलिसांनी महत्त्वाचा पुरावा मिळाला
भोंदू अशोक खरात हा त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांकडून नेहमी रोख स्वरुपात पैसे घ्यायचा. चेक किंवा ऑनलाईन पद्धतीने तो पैसे घ्यायचा नाही. याच रोख पैशांच्या माध्यमातून अशोक खरात याने मोठे साम्राज्य निर्माण केले. नेवासा येथील व्यावसायिकाला बनावट अंगठी आणि दागिने विकताना धनादेश न स्वीकारता रोख रक्कम घेतल्याचे तपासात उघडकीस आल्यानं खरातची फक्त रोख पैसे स्वीकारण्याच्या मोडस ऑपरेंडींचा पोलिसांना पत्ता लागला. जमिनी आणि इतर प्रॉपर्टी देखील इतरांच्या नावे खरेदी करून स्वतः नामानिराळे राहण्याचा प्रयत्न अशोक खरात करायचा. त्यामुळे आता अशोक खरात याची नेमकी संपत्ती किती आहे, हे शोधून काढणे पोलिसांसमोरील एक आव्हान आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.