अशोक खरात तेव्हा लगेच केबिनमधील झुंबर बंद करुन टाकायचा; कर्मचाऱ्यांसाठी सांकेतिक कोड, हादरवणारी
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat)याच्याशी संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशोक खरात याच्यावर नाशिक पोलिसांत 8 गुन्हे दाखल झाले आहेत. तर वावी पोलिसात अशोक खरात याने दिनेश परब आणि राजेंद्र जासूद विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. शिर्डी पोलिसांत अशोक खरातच्या ऑफिस बॉय विरोधात गुन्हा दाखल आहे, हे सर्व गुन्हे एकमेकांशी संलग्न असल्यानं सर्व गुन्ह्याचा एकत्रित तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल. एसआयटीच्या टीमने काल रात्री नाशिक क्राईम ब्राँचकडून डीव्हीआर, सीसीटीव्ही, लॅपटॉप, कागदपत्रे यासह सर्व मुद्देलमाल ताब्यात घेतला असून या सर्व प्रकरणाचा एकत्रित तपास आता केला जाणार आहे. याचदरम्यान, अशोक खरातबाबत विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरातने 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. जोडप्यांना समोर बसवून पत्नीमुळेच यशस्वी झाल्याचे पतीला सांगून तो महिलेच्या मनात सहानुभूती तयार करायचा. तसेच अशोक खरात हा मोठे अधिकारी, उद्योगपतींसोबत मुलींचे संबंध जुळवून द्यायचा. त्यासाठी तो अंकशास्त्राचा आधार घेत असल्याचे भासवायचा, असंही समोर आलं आहे. ज्या केबिनमध्ये तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा, त्या केबिनच्या बाहेर असलेल्या झुंबरचा लाइट आतून बंद करीत असे. या झुंबरातील लाइट बंद तोपर्यंत चेंबरमध्ये कोणालाही प्रवेश द्यायचा नाही, हा त्याचा अर्थ असे. त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना ही सांकेतिक भाषा माहिती होती, असंही चौकशीत समोर आलं आहे. (Ashok Kharat Viral Video)
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज
अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे. गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला?, तपास यंत्रणांचा शोध सुरू आहे. शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अशोक खरात शिवनिका संस्थानचे बँक खाते सील- (अशोक खरात शिवनिका संस्थान)
अशोक खरातच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) मालमत्तेची माहिती मागवली असून अशोक खरातच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरु आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास केला जाणार आहे. पुढील 2–3 दिवसांत तपासाला वेग येणार येईल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.