‘मी तुमचे भविष्य सांगतो, तुम्हाला काय होणार मला माहितीय’, अशोक खरातकडून कोठडीत भविष्यवाणी, नंतर

अशोक खरात: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी भोंदूबाबा अशोक खरात (Asho Kharat) प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असतानाच, आता पोलीस कोठडीत (Police Custody) घडलेली एक नवी घटना समोर आली आहे. लैंगिक शोषण, बलात्कार आणि जादूटोण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खरातने कोठडीतही आपली ‘भोंदूगिरी’ सुरूच ठेवल्याचे उघड झाले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कोठडीत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना खरातने पुन्हा एकदा ‘भविष्यवाणी’चा आधार घेत त्यांच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. “मी तुमचं भविष्य सांगतो, तुम्हाला काय होणार हे मला माहीत आहे,” अशा शब्दांत तो कर्मचाऱ्यांना उद्देशून बोलत होता.

Ashok Kharat: नाशिक पोलिसांनी भोंदूला ‘कायद्याचा बालेकिल्ला’च दाखवला!

पोलीस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही गोष्टी सांगत अशोक खरातने भीती आणि कुतूहल निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. या माध्यमातून पोलिसांची सहानुभूती मिळवून आपल्याशी सौम्य वर्तन व्हावे, असा त्याचा हेतू असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस त्याच्या या ‘भविष्यवाणी’च्या नाटकाला अजिबात बळी पडले नाही. नाशिक पोलिसांनी कायद्यापुढे कोणताही प्रभाव चालत नाही, हे खरातला ठामपणे दाखवून दिले. ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ काय असतो, याचा अनुभव त्याला प्रत्यक्षात दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Ashok Kharat: एसआयटीकडून खरातची तब्बल सात तास चौकशी

दरम्यान, महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांवरून भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून, सध्या त्याची विशेष तपास पथकाकडून (SIT) सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात तांत्रिक पुरावे, मालमत्तेचे तपशील, आर्थिक व्यवहार आणि इतर महत्त्वाची माहिती गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच, खरातचे जबाबही नोंदवून घेतले जात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, काल शनिवारी (दि. 21) एसआयटीकडून खरातची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी पार पडली. या दरम्यान, खरात आणि त्याचा कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधव यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अशोक खरात : नीरज जाधवचा सीडीआर तपसला

एसआयटीने नीरज जाधवचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासला असता, त्यात 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळल्याचे समोर आले आहे. जाधवच या महिलांना कॅप्टन खरातकडे ‘सल्ला’ घेण्यासाठी संपर्क करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फोकस प्रॉपर्टी येथे ऑफिसबॉय म्हणून काम करत असताना तो सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या संपर्कात आला होता. या प्रकरणाचा मास्टरमाईंड नीरज जाधवच्या CDR मधून आता महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat Viral Video: अशोक खरातच्या विकृतीचा नवा Video समोर, आईसमोरच मुलीला टी-शर्ट वर करायला सांगितला, नंतर केबल टेस्टर वापरून…

आणखी वाचा

Comments are closed.