अशोक खरातला अगोदरच अटकेची चाहुल लागली? तीन दिवसांपूर्वी शिर्डीतील बड्या हॉटेलमध्ये 3 IAS अधिकाऱ
अशोक खरात: नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असतानाच आता एक मोठी आणि संशयास्पद घडामोड उघड झाली आहे. खरातच्या अटकेच्या अवघ्या तीन दिवस आधी शिर्डीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांसोबत त्याची गुप्त बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. या बैठकीमुळे प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेच्या अवघ्या तीन दिवस आधी शिर्डीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांनी खरातची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. ही बैठक शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये पार पडल्याचे सांगितले जात असून, ‘विनोद’ नावाच्या व्यक्तीने ही भेट घडवून आणल्याची चर्चा आहे. शिर्डी परिसरात आरोपी कॅप्टन खरातचा विनोद नामक पंटर असल्याची माहिती समोर येत आहे.
Ashok Kharat: राज्यातील ते तीन IAS अधिकारी कोण?
या बैठकीत नेमके काय झाले, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्या तीन IAS अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. राज्यातील ते तीन IAS अधिकारी कोण? SIT चौकशीत याबाबतची माहिती समोर येणार का? विनोद चौकशीच्या फेऱ्यात येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ashok Kharat: शंभरहून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ
दरम्यान, अशोक खरातवर महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप असून, त्याच्या ताब्यातून शंभरहून अधिक व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. ‘तांत्रिक विधी’ आणि दैवी शक्तींच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे शोषण केल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने SIT स्थापन केली असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
Ashok Kharat: दोन लॅपटॉप, सुमारे 8 लाखांची रोकड जप्त
तपासादरम्यान खरातच्या विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून, दोन लॅपटॉप, सुमारे 8 लाखांची रोकड, एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, नाशिकमधील आलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय आणि पाथर्डी परिसरातील सुमारे ३० एकर जमीन यासह मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याचेही उघड झाले आहे.
Who Is Ashok Kharat: कोण आहे अशोक खरात?
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.