भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या
अशोक खरात: नाशिकमधील नराधम भोंदूबाबा अशोक खरात याच्याबाबत दिवसेंदिवस नवनवी माहिती समोर येताना दिसत आहे. अशोक खरात याच्या भक्तगणांमध्ये अनेक बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारण्यांचा समावेश होता. गरीब आणि सर्वसामान्य घरातील लोकांकडून फारसे पैसे मिळण्याची शक्यता नसल्याने अशोक खरात (Ashok Kharat) त्यांच्याकडे फारसे लक्षही द्यायचा नाही. अशोक खरात याचे बहुतांश भक्त हे श्रीमंत असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. हे भक्त अशोक घरात याला घसघशीत दक्षिणाही द्यायचे. यापैकी काही भक्त हे अशोक खरात याला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्म हाऊस अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छूक असत. अशा एका आऊट डोअर व्हिजिटसाठी अशोक खरात हा तब्बल 5 लाख रुपये घेत असल्याचे वृत्त ‘दैनिक लोकमत’ने दिले आहे. (Nashik Crime news)
अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी अशोक खरात याच्या नाशिकमधील बंगल्यावर आणि कार्यालयात बड्या भक्तांची गर्दी होत असे. याठिकाणी खरातचा दरबार भरत असे. त्यामुळे या परिसरात अनेक महागड्या कार दिसायच्या. तांत्रिक विधींच्यादृष्टीने अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्याने हे श्रीमंत भक्त अशोक खरात याने याचदिवशी आपल्यासोबत यावे, यासाठी आग्रही असत. या सगळ्यांपैकी जो जास्त पैसे देईल, त्याच्यासोबत अशोक खरात जात असे, अशी माहिती एसआयटीच्या तपासातून समोर आल्याचे समजते.
पुण्यातील अशाच एका करोडपती भक्ताला अशोक खरात याने पूजा करण्यासाठी गाडी हवी, असे सांगून 90 लाखांची महागडी कार खरेदी करायला लावली होती. ही कार अशोक खरात याने स्वत:च्या नावावर करुन घेतली होती.
Nashik Crime news: अशोक खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिलला संपणार
अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला आतापर्यंत तीनवेळा न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्याची पोलीस कोठडी आतापर्यंत दोनवेळा वाढवण्यात आली आहे. उद्या 1 एप्रिलला अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. त्याला पुन्हा न्यायालयात सादर केले जाईल. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटी पथकाकडून अशोक खरात याची कसून चौकशी करण्यात आली आहे. तसेच एसआयटीच्या पथकाने लैंगिक अत्याचार झालेल्या पिडीत महिलांना घेऊन खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात सीन रिक्रिएशन केले होते. यावेळी त्याच्या कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली. तेव्हा पोलिसांनी काही औषधं आणि रत्नं सापडल्याची माहिती काल समोर आली होती.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.