‘लक्ष्मण’चा झाला अशोककुमार! स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणणारा अशोक खरात ‘दहावी फेल’, गणितातही झाला होत

नाशिक : नाशिकमधील भोंदू ज्योतिषी आणि स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणून पदवी लावणारा अशोक खरात (Ashok Kharat) दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे येणाऱ्यांनी त्यांची जन्मतारीख सांगितल्यानंतर अंकशास्त्राचा अभ्यास असल्याचे सांगून वार आणि भविष्य सांगत होता, तोच खरात (Ashok Kharat)  दहावीच्या परीक्षेत गणित विषयात चक्क नापास झाल्याचेही उघड झाले आहे. अशोक खरातच्या शैक्षणिक वास्तव समोर आलं आहे.  दहावी परीक्षेत गणितात नापास झाल्याची माहिती समोर आले आहे. गुणपत्रिकेनुसार एकूण २५१ गुण, टक्केवारी सुमारे ३५.८८% तर मराठीमध्ये 39 इंग्रजीत 37 गणितात 28 विज्ञानात 62 समाजशास्त्राचा 38 आणि हिंदीमध्ये 47 गुण मिळाले होते. नाव बदलून ‘अशोककुमार’ तर कॅप्टन उपाधी लावून जहाजावर अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. खरातचे खरे नाव लक्ष्मण असल्याचं समोर आलं आहे.सिन्नर तालुक्यातील कहांडळावडीमध्ये खरात वावी येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे. अंकशास्त्र शिकवणारा व्यक्ती स्वतःच गणितात अपयशी झाल्याचे दिसून आले आहे.(Ashok Kharat)

शाळेत ‘लक्ष्मण’ असलेले मूळ नाव नंतर झालं ‘अशोककुमार’

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) आहे. तो शिक्षणासाठी तेथून चार किलोमीटरवर असलेल्या वावी येथील माध्यमिक शाळेत जात होता. १ जून १९६५ ची जन्मतारीख असलेल्या अशोक खरात याचे शाळेत नाव ‘लक्ष्मण एकनाथ खरात’ असे होते. या लक्ष्मण नावाने त्याने मार्च १९८३ मध्ये दहावीच्या बोर्डाची परीक्षा बैठक क्र. सी-५२३४१ या आसन क्रमांकाने दिली. त्यात खरात दोन विषयांत नापास झाल्याचे दिसून येते. खरात याला मराठी विषयात ३९, इंग्रजी ३७, गणित २८, विज्ञान ६२, समाजशास्त्र ३८, हिंदी ४७, असे एकूण २५१ गुण मिळाले होते. तर टक्केवारी जेमतेम ३५.८६ होती.(Ashok Kharat)

गॅझेटद्वारे नाव ‘अशोक’ केल्याची शक्यता

अशोककुमार खरात या नावाने सध्या आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत असलेल्या अशोक खरात याचे शाळेत नाव ‘लक्ष्मण’ होते. १९९५ मध्ये त्याने शाळेतून दाखला काढला. त्यानंतर गॅझेटद्वारे आपले नाव ‘अशोक’ केले असावे, अशी शक्यता आहे.

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकारणी अडचणीत आल्याची चर्चा आहे. या प्रकरणात संबंधित सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आणखी वाचा

Comments are closed.