श्रेयस अय्यर अन् यशस्वी जयस्वाल संघाबाहेर का? अजित आगरकरकडून प्रश्नाचं उत्तर, म्हणाला…
एशिया कप इंडिया पथक मुंबई : आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या संघाचं नेतृत्त्व पुन्हा सूर्यकुमार यादव करणार आहे. तर, शुभमन गिलनं पुनरागमन केलं असून त्याला उपकॅप्टन करण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर या दोघांना आशिया कपसाठी संघात स्थान मिळालं नाही. यासंदर्भात प्रश्न विचारल्यास निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी उत्तर दिलं आहे.
आशिया कपसाठी भारताचा संघ (Asia Cup India Squad)
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल (उपकॅप्टन ), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग
श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल संघाबाहेर, अजित आगरकर काय म्हणाला?
कॅप्टन सूर्यकमार यादव आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित आगरकर यानं भारतीय संघाची घोषणा केली. अजित आगरकर म्हणाले की यापूर्वी जेव्हा शुभमन गिल टी 20 मॅच खेळला त्यावेळी तो उपकॅप्टन होता. यशस्वी जयस्वाल दुर्दैवी ठरला, अभिषेक शर्मा ज्या प्रकारे खेळत आहे आणि तो थोड्या फार प्रमाणात गोलंदाजी देखील करु शकतो. श्रेयस अय्यर बद्दल बोलायचं झाल्यास त्याची काही चूक नाही, आम्ही केवळ 15 खेळाडू निवडू शकतो, असं अजित आगरकर म्हणाला.
आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)
9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान
सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना
आणखी वाचा
Comments are closed.