Asian Games 2026 – हिंदुस्थानच्या पोरी आशियात भारी! महिला क्रिकेट संघाने जिंकलं देशासाठी पहिलं सुवर्णपदक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

Asian Games 2026 मध्ये हिंदुस्थानच्या रणरागिणींनी सुवर्ण कामगिरी करत देशवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे. निसशिनमधील कोरोगि स्पोर्ट्स पार्कमध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 154 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले. ऐशियन गेम्स 2026 मध्ये हिंदुस्थानचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 216 अशी महाविशाल धावसंख्या उभारली, जी एशियन गेम्समधील महिला क्रिकेटमधील हिंदुस्थानची सर्वोच्च धावसंख्या ठरली. स्मृती मनधानाने 45 चेंडूंत 79, शेफालीने 48 तर ऋचाने 49 धावा चोपून काढल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 69 धावांत तंबुत धाडला. दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 तर शेफाली, श्रेयंका व श्री चरणीने प्रत्येकी 2 बळी टिपत संघाचा विजय निश्चित केला. या ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाने 2023 च्या सुवर्णपदकानंतर एशियन गेम्सच्या महिला क्रिकेटमध्ये दुसरे सुवर्णपदक आपल्या नावावर केले असून, 2010 व 2014 मध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या रेकॉर्डशी बरोबरी साधली आहे.

ऐशियन गेम्समध्ये हिंदुस्थानच्या आतापर्यंत कामगिरीचा विचार करता देशाच्या खात्यात 1 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 7 पदके जमा झाली आहेत. यापूर्वी शूटिंगमधून 5 पदके (हिमांशू ढिल्लों व एलावेनिल वलारिवन यांची रौप्य आणि रुद्रंक्ष पाटीलचे कांस्य सह सांघिक यश) तर मिक्स्ड मार्शल आर्ट्समधून सुचिका तारियाल हिने ऐतिहासिक कांस्यपदक मिळवून हिंदुस्थानचा पाया मजबूत केला होता.

Comments are closed.