Asian Games 2026 – हिंदुस्थानी पुरुष कबड्डी संघाचा इराणवर दणदणीत विजय, सुवर्णपदकावर कोरले नाव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या २०२६ च्या एशियन गेम्समध्ये हिंदुस्थानी पुरुष कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली आहे. शनिवारी झालेल्या अतिशय अटीतटीच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानने पारंपरिक प्रतिस्पर्धी इराणचा ४०-३४ असा पराभव केला. या विजयासह हिंदुस्थानने एशियन गेम्सच्या कबड्डी प्रकारातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले असून, या स्पर्धेच्या इतिहासातील हिंदुस्थानचे हे एकूण नववे सुवर्णपदक ठरले आहे. विशेष म्हणजे याच दिवशी सकाळी हिंदुस्थानी महिला कबड्डी संघानेही इराणचाच ३७-३४ असा पराभव करून सुवर्णपदक पटकावले होते.

हा अंतिम सामना अतिशय चुरशीचा ठरला. पहिल्या हाफमध्ये इराणने आपल्या दमदार टॅकलच्या जोरावर हिंदुस्थानावर १८-१७ अशी निसटती आघाडी घेतली होती. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाही इराणने आपली आघाडी तीन गुणांपर्यंत वाढवली होती. मात्र त्यानंतर कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी संघाने जोरदार पुनरागमन केले.

जयदीप आणि सुमित यांनी केलेल्या अचूक टॅकल आणि अर्जुनने रेडमध्ये आणलेले महत्त्वपूर्ण गुण यांमुळे हिंदुस्थानने सामन्यावर वर्चस्व मिळवले. दुसऱ्या सत्रात हिंदुस्थानने आक्रमक खेळ करत २३ गुण वसूल केले, तर इराणला केवळ १६ गुणांवर रोखले. अखेरच्या सत्रातील या संयमी आणि आक्रमक खेळाच्या बळावर हिंदुस्थानने हा सामना ४०-३४ असा जिंकला.

Comments are closed.