INDvsWI: जड्डूला इतिहास रचण्याची संधी, केवळ एक विकेट घेताच कोर्टनी वॉल्शचा रेकॉर्ड उद्ध्वस्त अन् बनेल नंबर 1

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (27 सप्टेंबर) खेळला जाणार असून भारताचा अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. यासाठी त्याला केवळ एका विकेटची आवश्यकता आहे.
जडेजा संघात परतला असून त्याची एका मोठ्या विक्रमावर नजर आहे. तिरुअनंतरपुरम येथिल ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात जडेजाने एक विकेट की इतिहास रचला जाणार आहे. तो भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल.
सध्या जडेजा वेस्ट इंडिजचे महान वेगवान गोलंदाज कर्टनी बॉल्श यांच्या बरोबरीत आहे. दोघांनी भारत विरूद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय सामन्यांमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक असे 44 विकेट्स घेतल्या आहेत.
वॉल्श यांनी 1985 ते 1999 दरम्यान भारताविरुद्ध 38 एकदिवसीय सामने खेळताना 44 विकेट्स घेतल्या, तर जडेजाने वेस्ट इंडिजविरुद्ध 32 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44 फलंदाजांना बाद केले आहे. यामुळे जडेजाला पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने एक विकेट घेतली की तो वॉल्श यांना मागे टाकेल.
वॉल्श आणि जडेजा यांच्यानंतर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि फिरकीपटू अनिल कुंबळे आहेत.
देव यांनी आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत वेस्ट इंडिजविरुद्ध 43 विकेट्स, तर कुंबळे यांनी 41 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच सर्व संघांची आकडेवारी पाहिली तर, वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स पाकिस्तानचे दिग्गज वसीम अक्रम यांनी घेतल्या आहेत. त्यांनी 1985 ते 2002 च्या कालावधीत वेस्ट इंडिजविरुद्ध 64 एकदिवसीय सामन्यांमध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत.
जडेजाला कपिल देव यांच्या खास यादीत सामील होण्याचीही संधी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जडेजा बॅटही चालली तर त्याला देव यांच्या खास यादीत प्रवेश मिळेल. यासाठी त्याला 95 धावांची आवश्यकता आहे. यामुळे तो एकदिवसीय सामन्यांमध्ये 3000+ धावा करणारा आणि 200+ विकेट्स घेणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरले.
जडेजाने आतापर्यंत 210 एकदिवसीय सामने खेळले असून त्यामध्ये 232 विकेट्स आणि 2905 धावा केल्या आहेत. देव यांनी 1978 ते 1994 दरम्यान भारताकडून 225 एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्यांनी 3783 धावा केल्या आणि 253 विकेट्स घेतल्या. त्यांच्यासारखी कामगिरी करण्याची संधी जडेजाकडे आहे. (IND vs WI ODI Series: A chance for Ravindra Jadeja to make history; taking just one wicket will shatter Courtney Walsh’s record and make him number one)
Comments are closed.