सकाळपासून पाळत अन् दुपारी वाजवला गेम, सहा महिन्यापूर्वी गणेश काळेला संपवण्याचा प्रयत्न फेल, पोल


पुणे: गणेश काळे याची हत्या करण्याचा प्रयत्न त्याच्या मारेकऱ्यांनी सहा महिन्यांआधी (Ganesh kale murder Case) देखील केला होता, हे पोलीस चौकशीतून समोर आलं आहे. त्यासाठी पुण्यातील आंबेगाव भागात सापळा देखील लावण्यात आला होता. मात्र गणेश काळे तेव्हा त्या भागात न आल्याने तो प्रयत्न (Ganesh kale murder Case) फसला होता. शनिवारी पुन्हा मारेकरी सकाळपासून त्याच्या मागावर होते. गणेश काळेची रिक्षा जिथे-जिथे जाईल तिथे-तिथे त्याचा पाठलाग होत होता. अखेर येवलेवाडीतील पेट्रोल पंपासमोर गणेश काळे याची हत्या (Ganesh kale murder Case) करण्यात आली. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येमध्ये २१ आरोपी आहेत. या आरोपींचे नातेवाईक आंदेकर टोळीच्या निशाण्यावर असल्याचं यातुन दिसून आलं आहे.(Ganesh kale murder Case)

Ganesh kale murder Case: शनिवारी सकाळी आठ वाजेपासून गणेश काळेवर पाळत ठेवली

आंदेकर टोळीने गणेश काळेच्या खुनासाठी गेल्या सहा महिन्यांपूर्वीपासून फिल्डींग लावली होती. मात्र आंबेगाव पठार परिसरात सोमनाथ गायकवाड याच्या घराच्या रेकीचा प्रकार समोर आल्यानंतर नियोजन फसले होते. अखेर शनिवारी (दि.१) दुपारी संधी मिळाली आणि अमन शेख, अरबाज पटेल आणि त्याच्या साथीदारांनी गणेश काळेचा गेम वाजवला. त्यासाठी शनिवारी सकाळी आठ वाजेपासून गणेश काळे याच्यावर पाळत ठेवली होती. त्यानंतर दुपारी चार वाजता संधी मिळताच त्याच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

Ganesh kale murder Case: आंदेकर टोळीवर आणखी एक मोक्का- अमितेश कुमार

गणेश काळे खूनप्रकरणी आंदेकर टोळीवर आणखी एक मकोका लावण्यात येणार आहे. या टोळीवर अगोदरच तीन मकोका आहेत अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गणेश काळे हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर काळे, याचा भाऊ आहे. याच समीर याने वनराजच्या खुनात वापरलेली पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. तर तो प्रत्यक्ष वनराज यांचा खून करताना तिथे उपस्थित होता. त्याने देखील वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या; परंतु त्याच्याकडून मिस फायर झाले होते. त्यामुळे तो आंदेकर टोळीच्या रडारवर आला होता. अखेर टोळीने त्याचा भाऊ गणेश काळेला रस्त्यात गाठलं आणि वनराज आंदेकरांच्या हत्येचा सेम पॅटर्न वापरून खून केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर, अमीर खान, अमन शेख अरवाज पटेल, मयूर वाघमारे यांच्यासह नऊ जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Ganesh Kale Murder: नेमकं काय प्रकरण?

काल (शनिवारी, ता १) दुपारच्या वेळी वर्दळ असलेल्या ठिकाणी एका ३२ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले. पुण्यातील खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या बोगदेव घाटातील रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोलपंपावरसमोरच हत्या करण्यात आली. गणेश काळे असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो रिक्षा चालक होता. गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे. वनराज आंदेकरच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप समीर काळे याच्यावर आहे. पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी याप्रकरणी सांगितले की, दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गणेश काळे हा रिक्षा घेऊन खडी मशीन चौकाच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी दोन दुचाकीवरून काही जण त्याचा पाठलाग करत आले. चौघांनी जवळून गणेश काळेवर गोळ्या झाडल्या. चार राऊंड फायर करण्यात आले.

गणेश काळे जखमी झाल्यानंतर त्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने दोन वार करण्यात आले. यात कोयत्याच्या हल्ल्याने त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. गणेश हा येवलेवाडीत राहत होता. तो खडीमशीन चौकाकडे येत होता. पेट्रोलपंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याला काहीच करता आलं नाही. त्याला सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला. गणेश काळेला चार गोळ्या लागल्या. मानेत, छातीत व पोटात गोळ्या घुसल्या. त्यावंतर तो तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तो खाली कोसळल्यानंतर दोन हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही हत्या गँगवारमधून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. ज्या पद्धतीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली होती, तो पॅटर्न गणेश काळेच्या हत्येसाठी वापरण्यात आला आहे. वनराज आंदेकरवर आधी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यानंतर कोयत्याने वार केले गेले होते. सप्टेंबर महिन्यात पुण्यातील नाना पेठमध्ये वनराजच्या भाच्याची आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली होती, असे म्हटले जाते. आता गणेश काळेच्या हत्येने आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.