जो रूटची क्षेत्ररक्षणातही ऐतिहासिक कामगिरी, कसोटी क्रिकेटच्या 149 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम केला नावावर
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेला पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट याने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही आघाड्यांवर धुरळा उडवून दिला आहे. फलंदाजी करताना त्याने अर्धशतक ठोकलं आणि सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी साधली. त्यानंतर क्षेत्ररक्षण करतानाही त्याने कसोटी क्रिकेटच्या 149 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 219 वा झेल टिपला आणि विश्वविक्रम आपल्या नावावर केला. पाकिस्तानच्या डावात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर फलंदाज अजान अवैसचा झेल घेत रूटने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. या विक्रमासह जो रूटने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला (218 झेल) मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये नॉन-विकीपर फील्डर म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी राहुल द्रविड (210 झेल), महेला जयवर्धने (205 झेल) आणि जॅक कॅलिस (200 झेल) यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या नावावर हे उच्चांक होते, ज्यांना आता रूटने मागे सोडले आहे.
Comments are closed.