IND vs SL: गोलंदाजी प्रशिक्षकांकडून कुलदीप यादवची पाठराखण! कोलंबो कसोटीतही मिळणार संधी?

श्रीलंकाविरुद्धच्या गॉल कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाच्या (Team india’s Playing Eleven) प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलाबाबत चर्चा सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) केवळ 1 विकेट मिळाली होती, त्यामुळे काही समीक्षक त्याला संघातून वगळण्याची मागणी करत आहेत.

कोलंबो कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले (Sairaj bahutule on Kuldeep Yadav) यांनी कुलदीप यादवची बाजू घेतली आहे. यासोबतच कोलंबो कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनबाबतही मोठा संकेत दिला आहे.

गॉल कसोटी सामन्यात कुलदीप यादवने दोन्ही डावात मिळून एकूण 25 षटके टाकली होती. यादरम्यान त्याला केवळ एक विकेट घेता आली, ज्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. सामन्यानंतर दोन दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले कुलदीपबद्दल म्हणाले, तो अतिशय चांगली गोलंदाजी करत आहे. गॉलमधील परिस्थितीच तशी होती, जिथे त्याला एक वेगळी भूमिका बजावावी लागली. माझ्या मते, तो नेहमीच सामना जिंकावून देणारा खेळाडू राहिला आहे आणि तो निश्चितपणे संघाच्या योजनेचा भाग आहे. सर्व फिरकी गोलंदाजांना जुन्या चेंडूमुळे संघर्ष करावा लागत आहे. पण बोटांच्या फिरकीपटूंसाठी (फिंगर स्पिनर्स) ते थोडे सोपे होते.

लेग-स्पिनरसाठी मात्र ते तितकेच कठीण असते, कारण चेंडू मऊ झाल्यामुळे सीम खाली बसते. पहिल्या कसोटी सामन्यानंतर रविचंद्रन अश्विनसारख्या (R. Ashwin) दिग्गजाने संघ व्यवस्थापनावर कुलदीप यादवचा योग्य वापर न केल्याचा आरोप केला होता. कुलदीप यादवला लांब स्पेल मिळाला नाही आणि त्याला जुन्या चेंडूने गोलंदाजी करावी लागली, असे त्याचे म्हणणे होते.

श्रीलंकेमध्ये जुन्या चेंडूने लेग स्पिनरला गोलंदाजी करणे कठीण जाते. अनेक दिग्गजांनी कर्णधार शुबमन गिलवर (Shubman gill) कुलदीपचा योग्य वापर न केल्याचा आरोप केला होता. अशा स्थितीत भारतीय संघ सध्या कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचा धोका पत्करणार नाही. कुलदीपला कोलंबो कसोटी सामन्यातही खेळण्याची संधी मिळू शकते.

Comments are closed.